शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

आता सुट्टीच्या दिवशीही नोंदणी कार्यालयं चालू राहणार; मुद्रांक विभागाचे परिपत्रक

By appasaheb.patil | Updated: March 21, 2023 18:08 IST

सोलापूर : गुढीपाडवा व मार्च अखेरच्या कामांमुळे मुद्रांक नाेंदणी कार्यालयं सुट्टीच्या दिवशीही चालू राहणार आहेत. त्यासंदर्भातील आदेश मुद्रांक महानिरीक्षकांनी ...

सोलापूर : गुढीपाडवा व मार्च अखेरच्या कामांमुळे मुद्रांक नाेंदणी कार्यालयं सुट्टीच्या दिवशीही चालू राहणार आहेत. त्यासंदर्भातील आदेश मुद्रांक महानिरीक्षकांनी जिल्हा मुद्रांक विभागाला कळविले आहे. त्यानुसार मुद्रांक जिल्हाधिकारी गो.द. गिते यांनीही यासंदर्भातील पत्रक काढले आहे.

सध्या आर्थिक वर्ष २०२२-२३ मधील मार्च अखेर सुरू आहे. १४ मार्चपासून शासकीय, निमशासकीय, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे १४ ते २० मार्च २०२३ या कालावधीत दुय्यम निबंधक श्रेणी कार्यालयातील दस्त नोंदणी १ बंद होती. त्यामुळे ब-याच दस्ताची नोंदणी होऊ शकली नाही, तसेच शासनाचा महसूलामध्ये देखील यामुळे घट झालेली आहे. आणि ज्याअर्थी, सदर बाबी विचारात घेऊन शासनाच्या महसूलात वाढ करण्यासाठी व आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये शासनाच्या महसूल इष्टांक पूर्तीसाठी २२ मार्च बुधवार गुढीपाडवा या शासकीय सुट्टीच्या दिवशी पक्षकारांच्या सोयीसाठी नोंदणी कार्यालये सुरू ठेवण्यात यावेत, असे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी निर्देशित केलेले आहे. 

त्यामुळे बुधवार २२ मार्च गुढीपाडवा या शासकीय सुट्टीचे दिवशी पक्षकारांच्या सोयीसाठी सोलापूर जिल्हयातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये सुरू ठेवण्यात येत आहेत. तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्व सह दुय्यम निबंधक वर्ग २ दुय्यम निबंधक श्रेणी यांनी २२ मार्च व शासकीय सुट्टीचे दिवशी सह दुय्यम निबंधक वर्ग २ व दुय्यम निबंधक श्रेणी कार्यालये सुरू ठेवावे व दस्त नोंदणीचे कामकाज करावे असे मुद्रांक जिल्हाधिकारी गाेविंद गीते यांनी कळविले आहे.