शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

आता सोलापुरातील कोरोना टेस्टचा अहवाल दोन तासात मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 13:08 IST

सीबी नॅट मशीन ‘सिव्हिल’मध्ये दाखल; महापालिकेतर्फे दिली रूग्णालयास मशीन

ठळक मुद्देकोरोनाचे निदान करण्यासाठी सिव्हिलमध्ये २४ तास (तीन शिफ्ट) काम सुरूआता नवीन यंत्र आणल्याने आणखी मायक्रोबायोलॉजिस्टची गरज भासणार सोलापुरात मायक्रोबायोलॉजिस्ट संख्येने फार कमी आहेत

सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयामध्ये (सिव्हिल) सीबी नॅट मशीन दाखल झाली आहे. या यंत्रामुळे फक्त दोन ते अडीच तासांमध्ये कोरोना आजाराचे निदान होणार आहे. गंभीर रुग्णांचा अहवाल लवकर येण्यासाठी या यंत्राचा उपयोग होईल. सोलापूर महापालिकेतर्फे ही मशीन सिव्हिलला देण्यात आली आहे.

सीबी नॅट मशीनद्वारे क्षयरोगाची तपासणी केली जाते. या मशीनद्वारे आता कोरोनाची चाचणी देखील घेण्यात येणार आहे. या मशीनचे वैशिष्ट्य म्हणजे यात स्वॅब टाकल्यानंतर मानवी हस्तक्षेपाशिवाय कमी वेळेत आजाराचे निदान होते. 

या मशीनमध्ये चाचणी करण्यासाठी आवश्यक असलेले ५०० किट देखील आणण्यात आले आहेत. या यंत्रामधून एकाचवेळी १६ जणांचे अहवाल मिळवता येऊ शकतात. मशीनवर दिवसभर तंत्रज्ञांनी काम केल्यास २०० ते ३०० जणांचे अहवालही मशीन देऊ शकते. शहरात तपासणी किटचे प्रमाण वाढवून लवकरात लवकर अहवाल येण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. या प्रकारची व्यवस्था आठवडाभरात सुरू करणार असल्याचे पालकमंत्री भरणे यांनी सांगितले होते. या अनुषंगानेही तयारी सुरू करण्यात आली आहे.

सीबी नॅट मशीन म्हणजे काय?- क्षयरोगाचे निदान करण्यासाठी कफ किंवा शरीराच्या अन्य भागातून फ्लूईड सॅम्पल घेतले जाते. हे सॅम्पल मशीनमध्ये टाकले जाते. याला कार्टेज बेस्ड न्यूक्लिक अ‍ॅसिड अ‍ॅम्प्लिफिकेशन टेस्ट (सीबी नॅट) असे म्हटले जाते. याद्वारे क्षयरोगाचे निदान तर होतेच. शिवाय आता या मशीनद्वारे कोरोनाचे निदानही होणार आहे. कोरोनाचे निदान करण्यासाठी प्रायमरचा वापर करण्यात येतो. पण, सीबी नॅट मशीनमधून कोरोनाचे निदान करण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या कार्टेजची गरज असते. या यंत्रामधून चार, आठ, सोळा नमुन्यांची तपासणी करता येते. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आलेल्या या मशीनमधून एका वेळी सोळा नमुने तपासता येतात.

मायक्रोबायोलॉजिस्टची गरज- कोरोनाचे निदान करण्यासाठी सिव्हिलमध्ये २४ तास (तीन शिफ्ट) काम सुरू आहे. त्यांच्याकडे असलेले मायक्रोबायोलॉजिस्ट हे निदान करण्यासाठी गुंतले आहेत. आता नवीन यंत्र आणल्याने आणखी मायक्रोबायोलॉजिस्टची गरज भासणार आहे. यासाठी जाहिरात देण्यात आली आहे. मात्र, सोलापुरात मायक्रोबायोलॉजिस्ट संख्येने फार कमी आहेत. यासाठी आता वैद्यकीय महाविद्यालयात काम करणाºया मायक्रोबायोलॉजिस्टला या कामासाठी विनंती करावी, असे पत्र जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरjobनोकरीMedicalवैद्यकीयcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस