शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

Good News; आता रेल्वे करणार स्वस्तात चादर-टॉवेलचीही वाहतूक करणार

By appasaheb.patil | Updated: July 16, 2020 11:23 IST

विभागीय व्यवस्थापकांची माहिती; व्यवसाय विकास युनिटची केली स्थापना 

ठळक मुद्देकोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे देशभरात रेल्वे प्रवासी सेवा बंददेशामध्ये विशेष पार्सल गाड्यांची सेवा सुरू करण्यात आली. मालाची/वस्तूची वाहतूक जलद सध्या रोडच्या माध्यमाने जाणाºया ट्रॅफिकमध्ये रेल्वेचा वाटा वाढविण्याचा प्रयत्न असणार

सोलापूर : कोरोनामुळे मागील तीन महिन्यात रेल्वेचे उत्पन्न कमी झाल्याने रेल्वेचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे़ रेल्वेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी रेल्वेच्या माध्यमातून  आता मालवाहतूक व्यापक करण्यावर भर दिला देण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेसोलापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक शैलेश गुप्ता यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

रेल्वेची प्रवासी सेवा बंद असल्याने रेल्वेचे उत्पन्न कमी झाले आहे़ कोरोनाच्या काळात मालवाहतूक व पार्सल गाड्या सुरूच आहेत़ २०२४ पर्यंत रेल्वेने चालविलेल्या मालवाहतुकीचे प्रमाण दुप्पट करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता रेल्वेने उत्पन्न वाढीसाठी रोडमार्गे जाणारा माल व पारंपरिक वस्तू या रेल्वे मालवाहतुकीकडे वळविण्यासाठी व्यापक धोरण आखण्यात येत आहे़ त्याबाबत क्षेत्रीय व विभागीय स्तरावर व्यवसाय विकास युनिटची स्थापना करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रमुख प्रदीप हिरडे यांनी दिली.

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात रेल्वेचे जाळे मोठ्या प्रमाणावर आहे़ या भागात साखर, अन्नधान्य, शेतीमाल, चादर, टॉवेल, शेती अवजारे, खते, बी-बियाणे, औद्योगिक वसाहतीमध्ये निर्माण होणारा कच्चा व पक्का माल हा रेल्वेच्या मालवाहतुकीकडे वळविण्यासाठी प्रचार, प्रसार व प्रसिद्धी करण्यात येणार असल्याचेही गुप्ता यांनी सांगितले.

डेप्युटी चीफ कमर्शियल मॅनेजर व्यवसाय विकास युनिटचे सेक्रेटरी म्हणून काम पाहणार आहेत़ यांच्यामार्फत प्रस्तावित मालाचा प्रस्ताव एकत्रित करून अंतिम पाठपुरावा करण्यासाठी मुख्यालयातील व्यवसाय विकास युनिटकडे पाठविण्यात आल्यानंतर निर्णय घेण्यात येईल. साधारण: इतर वाहनांपेक्षा कमी दराने मालवाहतुकीला रेल्वे प्रशासन प्राधान्य देणार आहे़ त्यासाठी क्षेत्रीय व विभागीय स्तरावर योग्य पद्धतीने नियोजन सुरू असल्याचेही गुप्ता यांनी सांगितले़ मागील काही महिन्यांपासून रेल्वेचे उत्पन्न वाढीसाठी विविध उपाययोजनां करण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले.

आठवड्यातून एकदा होणार बैठक विभागीय स्तरावर आठवड्यातून एकदा यासंदर्भात बैठक करण्यात येणार आहे. या बैठकीत रेल्वेकडे ट्रॅफिक आकर्षित करण्याकरिता विविध आयडिया आणि सध्या रोडच्या माध्यमाने जाणाºया ट्रॅफिकमध्ये रेल्वेचा वाटा वाढविण्याचा प्रयत्न असणार आहे़ मुख्यालय आणि विभागातील व्यवसाय विकास युनिटने देखील उद्योग आणि व्यापाराच्या प्रलंबित तक्रारीचे निराकरण करण्याचे लक्ष्य मध्य रेल्वेच्या सर्वच अधिकाºयांनी ठेवले आहे़

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे देशभरात रेल्वे प्रवासी सेवा बंद करण्यात आली, त्यामुळे पार्सल, मालवाहतुकीवर त्याचा परिणाम झाला. त्यामुळे देशामध्ये विशेष पार्सल गाड्यांची सेवा सुरू करण्यात आली. मालाची/वस्तूची वाहतूक जलद आणि सुरक्षित पाठविण्यासाठी रेल्वे मार्गाच्या पर्यायाचा वापर केला जातो.     - शैलेश गुप्ता, डीआरएम, रेल्वे

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वे