शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

Good News; आता सोलापूर विभागातील शेतकºयांनाही मिळणार किसान रेलची सेवा

By appasaheb.patil | Updated: August 20, 2020 14:29 IST

मध्य रेल्वे: रोड वाहतुकीपेक्षा रेल्वे वाहतुकीचे भाडे कमी, जलद व सुरक्षित माल पोहोचणार

ठळक मुद्देया किसान रेलमध्ये असलेल्या प्रत्येक कृषी मालाची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असणारया पार्सल विशेष गाडीमध्ये कोणत्याही पॅसेंजरना प्रवेश देण्यात येणार नाही रेल्वे गाडीत चोरीसारख्या घटना घडू नये, शेतकºयांचे नुकसान होऊ नये यासाठी आरपीएफ पोलीस तैनात

सोलापूर : मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातील शेतकºयांच्या शेतात पिकविलेला माल आता जलद व कमी खर्चात हव्या त्या ठिकाणी पोहोचविणे सोपे झाले आहे़ दरम्यान, २१ आॅगस्टपासून प्रायोगिक तत्त्वावर भारतीय रेल्वे मंत्रालयाने सुरू केलेली किसान रेल सोलापूर विभागातून प्रयागराज चौकी, न्यू चौकी (अलाहाबाद चौकी), दीनदयाल उपाध्याय (मुघलसराय), बक्सर, दानापूर (पटणा) आणि मुझफ्फरपूरपर्यंत धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

दरम्यान, रेल्वे मंत्रालयाने नाशवंत कृषी मालाच्या वाहतुकीसाठी किसान रेल गाडीची सेवा सुरू केली़ या रेल्वेतून भाजीपाला आणि फळांची वाहतूक करण्यात येणार आहे. सोलापूर आणि पुणे विभागामधील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पुणे, अहमदनगर परिसरातील शेतकरी डाळिंब, केळी, द्राक्षे इत्यादी फळे, भाजीपाला, फुले, कांदे अशा शेतमालाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात़ ही ट्रेन छोटे शेतकरी आणि छोट्या व्यापाºयांच्या कृषी उत्पादनाच्या वाहतुकीची गरज भागविणार आहे. मार्गावरील सर्व थांब्यांवर नाशवंत मालाची लोडिंग आणि अनलोडिंग करण्याची परवानगी दिली आहे. ही सेवा सुरुवातीला आठवड्यातून एकदा असणार आहे.

असा असेल किसान रेलचा प्रवासकिसान रेल प्रारंभी कोल्हापूरहून निघेल. मिरज, सांगोला, पंढरपूर, कुर्डूवाडी, दौंड आणि अहमदनगर या स्थानकांवर थांबेल. सदर गाडीचे डबे गाडी क्र. ००१०७/ ००१०८ देवळाली-मुझफ्फरपूर-देवळाली गाडीला मनमाड रेल्वे स्थानकावर जोडले व काढले जातील. यामुळे प्रयागराज चौकी, न्यू चौकी (अलाहाबाद चौकी), दीनदयाल उपाध्याय (मुघलसराय), बक्सर, दानापूर (पटणा) आणि मुझफ्फरपूर या परिसरात नाशवंत कृषी माल पाठविण्यात येणार आहे़ यामुळे शेतकरी आणि व्यापाºयांचा माल सुरक्षित आणि जलदगतीने पोहोचविण्यात रेल्वे प्रशासन यशस्वी ठरणार आहे़ 

चोरी रोखण्यासाठी आरपीएफ जवान तैनातया किसान रेलमध्ये असलेल्या प्रत्येक कृषी मालाची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असणार आहे. या पार्सल विशेष गाडीमध्ये कोणत्याही पॅसेंजरना प्रवेश देण्यात येणार नाही. दरम्यान, रेल्वे गाडीत चोरीसारख्या घटना घडू नये, शेतकºयांचे नुकसान होऊ नये यासाठी आरपीएफ पोलीस तैनात करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली़ 

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वेagricultureशेती