आता भाजपही म्हणतोय, राष्ट्रवादीच्या नेत्यानेही केला आचारसंहितेचा भंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:45 IST2020-12-05T04:45:00+5:302020-12-05T04:45:00+5:30
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे मतदान चालू असताना राष्ट्रवादीचे नेते दीपक साळुंखे-पाटील यांनी मंगळवेढा येथील भाग क्र. ३९४, ३९५, ३९६ या ...

आता भाजपही म्हणतोय, राष्ट्रवादीच्या नेत्यानेही केला आचारसंहितेचा भंग
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे मतदान चालू असताना राष्ट्रवादीचे नेते दीपक साळुंखे-पाटील यांनी मंगळवेढा येथील भाग क्र. ३९४, ३९५, ३९६ या बुथवर आत जाऊन बॅलेटपेपर चेक केले. बुथमध्ये फिरून आले. या ठिकाणी आचारसंहितेचा भंग केला आहे. हा सर्व प्रकार सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झाला असल्याने त्यांच्यावर कार्यवाही करावी, असे निवेदन भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दिले आहे. याबाबत माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील यांना विचारले असता, त्यांनी या प्रकरणाबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
----
०३मंगळवेढा-साळुंखे