शहरं
Join us  
Trending Stories
1
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
2
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
3
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
4
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
5
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
6
Mahabharat: एखादी गोष्ट बायकांच्या पोटात राहत नाही, त्याला कारणीभूतआहे महाभारतातली 'ही' कथा!
7
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
8
PM Kisan योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा
9
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
10
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
11
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
12
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
13
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
14
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
15
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
16
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा
17
Monsoon Recipe: तुम्ही कधी पंजाबी शिरा 'प्यायलात' का? ट्राय करा, पावसाळी आजारांवरचा चविष्ट उपाय!
18
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
19
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
20
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...

कोरोना प्रतिबंधासाठी आता प्रथमोपचार पेटीत ऑक्सिमीटरची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 14:11 IST

कोरोनाशी दोन हात : वाफारा यंत्र, तापमापकाचीही मागणी वाढली

ठळक मुद्देप्रथमोपचार पेटीमध्ये सर्दी, अंगदुखी, ताप, जुलाब यावरही प्रतिबंधात्मक औषधेहीआता खबरदारी म्हणून घरोघरी डिजिटल तापमापक , आॅक्सिमीटर तसेच वेपोरायझरज्यांच्याकडे अशा प्रकारची यंत्रे नाहीत त्यांनीही खरेदी सुरू केली आहे

सोलापूर : शरीरातील ऑक्सिजनची पातळी हा कोरोना तपासणीतील महत्त्वाचा घटक आहे. आता घरच्या घरी आपली आॅक्सिजन पातळी तपासण्याकडे लोकांचा कल वाढला आहे़ कोरोनाच्या धसक्याने लोकांमध्ये आरोग्यविषयक सतर्कता वाढली आहे़ त्यामुळे सद्यस्थितीत सोलापुरात ऑक्सिमीटरचा खप आणि वापर दणक्याने वाढला आहे़ प्रथमोपचार पेटीत आता या अशा साधनांची भर पडली आहे.

कोरोना आता उंबरठ्यापर्यंत येऊन पोहोचला असल्याने लोकांमध्ये जागरुकता वाढली आहे़ स्वत:च्या व कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी मास्कबरोबर सॅनिटायझर, ऑक्सिमीटर, वेपोरायझर खरेदी करू लागले आहेत़ मागणी वाढल्याने आता ऑक्सिमीटरची कमतरता भासू लागली आहे.

पल्स ऑक्सिमीटर हे खिशात बाळगता येण्यासारखे छोटे उपकरण आहे़ ते बोटाला लावून शरीरातील आॅक्सिजनचे प्रमाण मोजले जाते़ या प्रकारच्या चाचणीमध्ये रुग्णाला कोणतीही दुखापत किंवा वेदना होत  नाहीत़ ही चाचणी करणे क ोणालाही सहज शक्य होते़ शरीरातील आॅक्सिजनची पातळी हा कोरोना तपासणीतील महत्त्वाचा भाग असल्याने आता त्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे़ आॅक्सिमीटर या डिव्हाईसरुपी यंत्रात व्यक्तीचे बोट ठेवताच काही क्षणात त्यावर आॅक्सिजनचे प्रमाण आकड्यांमध्ये दिसते़ हे प्रमाण ९५ पेक्षा अधिक असणे हे उत्तम लक्षण आहे;  मात्र ते ८० पर्यंत खाली आले असेल तर तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधणे गरजेचे आहे़त्याद्वारे नाडीचे ठोकेही मोजले जातात.

कोरोना प्रतिबंधासाठी अन्य खरेदीहीप्रथमोपचार पेटीमध्ये सर्दी, अंगदुखी, ताप, जुलाब यावरही प्रतिबंधात्मक औषधेही ठेवली जात आहेत़ आता खबरदारी म्हणून घरोघरी डिजिटल तापमापक , आॅक्सिमीटर तसेच वेपोरायझर (वाफारा यंत्र) घेतले जात आहे. नेबोलायझर अनेकांकडे आहे़ कप पातळ करण्यास त्याची मदत होते़ ज्यांच्याकडे अशा प्रकारची यंत्रे नाहीत त्यांनीही खरेदी सुरू केली आहे़ 

महिनाभरात पूर्वी के वळ तीन ऑक्सिमीटर विकले जायचे़ ऑक्सिमीटरबरोबरच वेपोरायझर आणि नेबोलायझरचीही मागणी वाढली आहे़ शहरात जवळपास ३०० औषध दुकाने आहेत़ या सर्व दुकानांमध्ये या साधनांची मागणी होत आहे़- यासीर शेख औषध विक्रेते

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यMedicalवैद्यकीयhospitalहॉस्पिटल