शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

आमचंही योगदान लक्षात घ्या..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2020 1:13 PM

कोरोना व्हायरस तथा कोवीड-१९ या महामारीने पूर्ण जगाला विळखा घातला आहे. महाराष्ट्रातही दिवसेंदिवस त्याचा फैलाव वाढत आहे. आपत्कालिन परस्थिती ...

कोरोना व्हायरस तथा कोवीड-१९ या महामारीने पूर्ण जगाला विळखा घातला आहे. महाराष्ट्रातही दिवसेंदिवस त्याचा फैलाव वाढत आहे. आपत्कालिन परस्थिती घोषित करून संचारबंदी घोषित केली आहे. घराच्या बाहेर पडण्यास प्रत्येकाला प्रतिबंध केला आहे. अशा जीवघेण्या संसर्गजन्य आजारापासून दूर राहण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करत आहे. अशावेळी जनतेला अत्यावश्यक सेवा देण्यासाठी पोलीस, डॉक्टर्स, नर्स, सफाई कामगार, मीडिया हे रात्रंदिवस आपलें कार्य करीत आहेत प्रत्येकाचे कौतुक देखील होत आहे आणि ते झालेही पाहिजे. त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप पडली पाहिजे.

परंतु घरात बसून ज्यामुळे वेळ काढू शकतो तो मोबाईल, टेलिव्हिजन, पंखा, एसी, लाईट किंवा दवाखान्यातील डॉक्टरचे ईलाज हे सर्व घडत आहे तो वीजपुरवठा अखंडित ठेवणारा, जीव धोक्यात घालून रात्रंदिवस राबणारा महानिर्मिती, महापारेषण, महावितरणचा अधिकारी- कर्मचारी यांची नोंद घेताना, उल्लेख होताना कुठे ही दिसत नाही. सहानुभूती दाखविली जात नाही. २ तास अन्नपाणी नाही मिळाले तरी चालते, १ तास रस्ता अडवला तरी चालतो, कोणत्याही कामात विलंब झालेला सहन करतो, कार्यालयीन दिरंगाई खपवून घेतो पण वीज बंद झालेली चालत नाही. वीज गेली की लगेच बेचैन होतो. लगेच कर्मचाºयांच्या नावाने लाखोली वहायला सुरू करतो.कोणत्याही कार्यालयातील कर्मचाºयाच्या फोन क्रमांकाची नोंद आपल्याजवळ नसली तरी चालते, परंतु वीजपुरवठ्यासंबंधी संबंधी वायरमन व सबस्टेशन पासून सर्व वरिष्ठ अधिका?्यांपर्यंत सर्वांच्या फोन क्रंमाकाच्या नोंदी कुटुंबातील सर्व व्यक्तीकडे असतात. वीजपुरवठा बंद पडला की, वेळकाळ न पहाता फोनवर रात्रीबेरात्री अखंड, अर्वाच्च भाषेत जागरूकता दाखविली जाते.  कर्मचाºयाला दमदाटी केली जाते. शिवाय काम पूर्ण झाल्यावरही कोणी त्याची सौजन्याने धन्यता मानील ही अपेक्षा दुरापास्त.

वीज कर्मचाºयालाही विश्रांतीची गरज असते, त्यालाही कुटुंब आहे, मुलबाळं आहेत, घरची कामे आहेत हे सर्व दुर्लक्षित करतो. म्हणूनच सतत त्रस्त, काळवंडलेले चेहरेच वीज कर्मचाºयांचे दिसून येतात. 

२४ तास कामाची बांधिलकी ! शिवाय जीवघेण्या विजेशी दिवसरात्र खेळताना केंव्हा जायबंदी होईल किंवा जीव गमवावा लागेल याचा भरोसा नाही. ग्राहकांची, जनतेची मर्जी राखत, त्यांचा मानसन्मान ठेवत अहोरात्र राबणाºया वीज कर्मचाºयाला शाब्बासकीची थाप कल्पनाबाह्य ! कामाचे कौतुक आणि प्रोत्साहन हे काम करणाºया  माणसात आणखी काम करण्याची उर्जा निर्माण करीत असते. प्रगत आणि जागृत देशामध्ये नोकरी हा नागरिकत्वाचा सन्मान असतो, लोकशाहीतील सजग नागरिकांनी तो जोपासला पाहिजे.??- अमेय केत(लेखक महापारेषणमध्ये उपकार्यकारी अभियंता आहेत.)

टॅग्स :Solapurसोलापूरmahavitaranमहावितरणcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस