मांसाहरी जेवण दिले नाही चिरला मित्राचा गळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:16 IST2021-06-27T04:16:01+5:302021-06-27T04:16:01+5:30

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, समाधान सुरेश गायकवाड (वय २९, रा. संतपेठ, महात्मा फुले चौक, पंढरपूर), भारत व बाळा हे तिघेजण ...

Non-vegetarian food is not given | मांसाहरी जेवण दिले नाही चिरला मित्राचा गळा

मांसाहरी जेवण दिले नाही चिरला मित्राचा गळा

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, समाधान सुरेश गायकवाड (वय २९, रा. संतपेठ, महात्मा फुले चौक, पंढरपूर), भारत व बाळा हे तिघेजण स्मशानभूमी शेजारील हॉलमध्ये मांसाहाराची पार्टी करत होते. यावेळी त्या ठिकाणी दादा कदम व किशोर दिलीप बंदपट्टे (दोघे रा. पंढरपूर) हे दोघे आले. आम्हाला जेवण द्या म्हणून मारहाण करू लागले.

या दरम्यान दादा कदम याने समाधान गायकवाड यांच्या गळ्यावर व मानेवर चाकूने वार केला. तर किशोर बंदपट्टे यांनी लाकडाने मारहाण केली.

यामुळे सपोनि कपिल सोनकांबळे यांनी दादा कदम व किशोर दिलीप बंदपट्टे यांना ताब्यात घेतले. त्या दोघांना शनिवारी न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायाधीशांनी त्या दोघांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अरुण पवार यांनी दिली आहे.

Web Title: Non-vegetarian food is not given