लॉकडाऊनची नाही चिंता; खरेदीसाठी गाठू कर्जत, परंडा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:26 IST2021-08-21T04:26:49+5:302021-08-21T04:26:49+5:30
करमाळा तालुका अहमदनगर, उस्मानाबाद व पुणे या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. करमाळा तालुक्यात कडक निर्बंध असले तरी शेजारच्या उस्मानाबाद, ...

लॉकडाऊनची नाही चिंता; खरेदीसाठी गाठू कर्जत, परंडा!
करमाळा तालुका अहमदनगर, उस्मानाबाद व पुणे या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. करमाळा तालुक्यात कडक निर्बंध असले तरी शेजारच्या उस्मानाबाद, पुणे व अहमदनगर जिल्ह्यात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. करमाळा तालुक्यातील आवाटी, सालसे, घोटी, नेरले, कोळगाव या गावांतील ग्रामस्थ शेजारीच दहा-बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या परंडा तालुक्यात जाऊन बाजारपेठेत व्यवहार करीत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत, राशीन हे करमाळ्यापासून वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे, तर पुणे जिल्ह्यातील इंदापूर उजनी बॅकवाॅटर भागातील चिखलठाण, कुगाव, वांगी, केत्तूर, पोमलवाडी यागावच्या ग्रामस्थांना नावेतून पंधरा ते वीस मिनिटाचे अंतर आहे. इंदापूर जिल्ह्यातील भिगवणकडे पारेवाडी, जिंती, टाकळी, रामवाडी, भिलारवाडी, हिंगणी, कोंढारचिंचोली, कावळवाडी येथील ग्रामस्थ व्यवहारासाठी जा-ये करतात.
.......
चेकपोस्टवर होईना तपासणी
करमाळा तालुक्याच्या सीमेवर आवाटी, डिकसळ पूल, जातेगाव, डुकरेवाडी, कोर्टी या ठिकाणी पोलिसांची तपासणी नाके कार्यरत आहेत. पण कोणत्याही वाहनधारकांची चौकशी व विचारणा होत नसल्याने वाहने सुसाट वेगात जा-ये करतात.
.....
उजनी जलाशय काठावर असलेल्या चिखलठाण येथे कोटलिंगनाथ मंदिर आहे. पुणे जिल्ह्यातील हजारो भाविक दर्शन जलाशयातून बोटीव्दारे येतात. त्यांची कोठेही तपासणी अथवा विचारपूस होत नाही. त्यांच्या फटका चिखलठाण, कुगाव, वांगी व परिसरातील गावांना बसत आहे.
........
फोटो येणार आहे.