शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील एकही साखर कारखाना विकणार नाही, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची आश्वासन, सोलापुरात बंद कारखान्यांसंदर्भात झाली बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 17:23 IST

दुष्काळी परिस्थितीमुळे व कर्जाच्या ओझ्याने राज्यातील अनेक साखर कारखाने बंद अवस्थेत असून यापैकी एकाही साखर कारखान्याची विक्री केली जाणार नाही, उलट पुढील वर्षीच्या हंगामासाठी बंद असलेल्या कारखान्यांपैकी किमान १० कारखाने सुरू करण्याचा आमचा प्रयत्न राहील.

ठळक मुद्दे उस्मानाबाद व अन्य जिल्ह्यातील अन्य बंद कारखान्यांबाबत चर्चाबंद असलेल्या कारखान्यांसंदर्भात विभागनिहाय बैठका घेऊन मार्ग काढण्यात येईल : सहकारमंत्री सुभाष देशमुख राज्यातील काही साखर कारखाने अनेक वर्षांपासून बंद

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १ : दुष्काळी परिस्थितीमुळे व कर्जाच्या ओझ्याने राज्यातील अनेक साखर कारखाने बंद अवस्थेत असून यापैकी एकाही साखर कारखान्याची विक्री केली जाणार नाही, उलट पुढील वर्षीच्या हंगामासाठी बंद असलेल्या कारखान्यांपैकी किमान १० कारखाने सुरू करण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे राज्याचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरणा व तुळजाभवानी साखर कारखाना भाडेतत्वावर किंवा भागीदारीत चालविण्यासाठी देण्यासाठी सोलापुरात झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते. बैठकीला आमदार राणाजगजितसिंह पाटील, आ. सुजितसिंह ठाकूर, साखर संचालक किशोर तोष्णीवाल, सहसंचालक अशोक गाडेंसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. राज्यातील काही साखर कारखाने अनेक वर्षांपासून बंद आहेत. या साखर कारखान्यांवर असलेले बँकांचे कर्ज वरचेवर वाढत असून, कारखान्यांवर अवसायक नेमले आहेत. बँकांनी थकबाकीमुळे काही कारखान्यांची मालमत्ता ताब्यात घेतली असून, काही कारखाने कारवाईच्या विरोधात डी.आर.ए.टी. (कारखानदारीबाबत वित्तीय न्यायालय) मध्ये गेले आहेत. काहीकेल्या कर्ज भरणेही शक्य नाही व कारखानेही सुरू होत नसल्याने असे कारखाने सुरू करण्यासाठी बँका, अवसायक व साखर आयुक्तांशी चर्चा करुन मार्ग काढण्यासाठी ही बैठक बोलावली होती, असे सहकार मंत्र्यानी सांगितले. बंद असलेल्या कारखान्यांसंदर्भात विभागनिहाय बैठका घेऊन मार्ग काढण्यात येईल, असेही सहकार मंत्र्यांनी सांगितले. बैठकीत उस्मानाबाद व अन्य जिल्ह्यातील अन्य बंद कारखान्यांबाबत चर्चा झाली. बैठकीला उस्मानाबाद जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार, उपाध्यक्ष कैलास नेटके, भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, तुळजाभवानी कारखान्याचे अवसायक सुदाम रोडगे, तेरणा कारखान्याचे अवसायक विजय घोणसे-पाटील, सहायक निबंधक विकास जगदाळे आदी उपस्थित होते. --------------------तेरणा, तुळजाभवानीवर ३९७ कोटी कर्ज - ढोकीच्या तेरणा सहकारी साखर कारखान्यावर मुद्दल १२७ कोटी ३१ लाख १२ हजार, व्याज १५० कोटी २५ लाख ८४ हजार असे २७७ कोटी ५६ लाख ९६ हजार कर्ज व नळदुर्गच्या तुळजाभवानी कारखान्यावर मुद्दल ४८ कोटी ३१ लाख ३० हजार व व्याज ७१ कोटी २८ लाख २० हजार असे ११९ कोटी ५९ लाख ५० हजार कर्ज आहे. थकबाकीमुळे या कारखान्यांवर अवसायक नेमले असून, कारखाने भाडेतत्वावर किंवा भागीदारीत चालविण्यासाठी ही बैठक सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात झाली. 

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेSubhash Deshmukhसुभाष देशमुख