शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पुणे अन्‌ बल्लारीहून वेळेत ऑक्सिजन मिळेना; सोलापुरातील प्रशासनाची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 14:08 IST

विभागीय आयुक्तांकडे साकडे: शहरातील हॉस्पिटल प्रशासनाला चिंता

सोलापूर : मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने सोलापूर जिल्ह्यात ‘प्राणवायू’साठी रोजच धावाधाव होत आहे. बल्लारी तसेच पुणे येथून सोलापूरला प्राणवायूचा पुरवठा होत असून, दोन्ही ठिकाणांहून वेळेवर ऑक्सिजनचा पुरवठा होता होईना. त्यामुळे रोज पहाटे चार ते पाचपर्यंत ऑक्सिजनचे वितरण सुरू आहे. सोलापूरला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा नियोजित वेळेनुसार व्हावा, असे साकडे विभागीय आयुक्तांना घालण्यात आले आहे. विभागीय आयुक्तांनी या प्रश्नी लक्ष देऊन ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा, अशी विनंतीही त्यांच्याकडे करण्यात आली आहे.

सोलापूर जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे याबाबत पाठपुरावा सुरू ठेवला आहे. मंगळवारी सोलापूरला ३८ मेट्रिक टन प्राणवायूचा पुरवठा झाला. रात्री उशिरापर्यंत बल्लारी आणि पुण्याहून प्राणवायूचे टँकर येत राहिले. त्यामुळे पहाटेपर्यंत वितरण प्रणाली राबवताना अधिकाऱ्यांची दमछाक झाली.

मंगळवारी सोलापूरला ४९ मेट्रिक टन प्राणवायूची आवश्यकता होती, तर दोन्ही ठिकाणांहून फक्त ३८ मेट्रिक टनचा पुरवठा झाला. उर्वरित ११ टन प्राणवायुसाठी अधिकार्‍यांची रात्री उशिरापर्यंत धावपळ सुरू होती. रविवारी २ मे रोजी सोलापूरला फक्त अठरा टनचा पुरवठा झाला. त्यामुळे सोमवारी दिवसभर प्राणवायूकरिता सोलापूर जिल्ह्यात आणीबाणीसारखी स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे प्राणवायूचे रिकामे सिलिंडर लातूरला पाठवून प्राणवायू मागवले.

पुरवठा केंद्रांवर अधिकारी तैनात

सोलापूर जिल्ह्यातील प्राणवायू निर्मिती केंद्रावर तसेच पुरवठा केंद्रावर जिल्हा प्रशासनाने अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. सोलापूर जिल्ह्यात प्राणवायूचा तुटवडा आहे. त्यामुळे येथील प्राणवायू परजिल्ह्यात किंवा परप्रांतात जाऊ नये, याची दक्षता प्रशासनाकडून घेतली जात आहे. प्राणवायू पुरवठा केंद्रावर येणाऱ्या प्रत्येक गाडीचा आणि केंद्रातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक गाडीचा हिशोब सदर अधिकारी ठेवत आहेत. विशेष म्हणजे प्राणवायूकरिता रोजच रुग्णालयाकडून मोठा दबाव येत आहे. जिल्ह्यातील मोठ्या रुग्णालयातील प्रतिनिधी सकाळी आणि संध्याकाळी जिल्हा प्रशासनाकडे येऊन ठाण मांडत आहेत. प्राणवायूकरिता दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात मागणी आणि दबाव येत असल्याने वितरण करता करता प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाOxygen Cylinderऑक्सिजनhospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्या