शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

यंदा सोलापुरातील मीना बाजार नाही... खरेदी नाही.. मेरी ईद सादगी से !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 11:24 IST

साध्या पध्दतीने ईद साजरी करण्याचा आवाहन; कोरोनाचा संसर्ग पाहता घेतला निर्णय

ठळक मुद्देकोरोनाच्या लॉकडाऊनमुळे आठवडा बाजार बंद ठेवण्यात आलेरमजाननिमित्त मीना बाजारसह इतर बाजार भरणार का? याकडे लक्ष लागलेमीना बाजारबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र, यासंदर्भात पोलीस आयुक्तांसोबत चर्चा होणार

सोलापूर : कोरोनाचा लॉकडाऊन कायम आहे आणि रमजान ईद अवघ्या सहा दिवसांवर आली आहे. कोरोनाचा संसर्ग पाहता यंदा ईदनिमित्त मीना बाजार भरवू नये. लोकांनी शॉपिंग करण्याऐवजी साध्या पद्धतीने ईद साजरी करावी, असे आवाहन मुस्लीम समाजातील सामाजिक संघटना, राजकीय नेते यांच्याकडून केले जात आहे.

रमजान ईदसाठी दरवर्षी शहरातील बाजारपेठा सजलेल्या असतात. विजापूर वेस परिसरात भरणारा मीना बाजार गर्दीने गजबजलेला असतो. जिल्ह्याच्या विविध भागातील मुस्लीम बांधव या बाजारात खरेदीसाठी येतात. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे आठवडा बाजार बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे रमजाननिमित्त मीना बाजारसह इतर बाजार भरणार का? याकडे लक्ष लागले आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मनपा आयुक्त दीपक तावरे यांनी नुकतेच यासंदर्भात महापालिकेतील गटनेत्यांशी चर्चा केली. 

या बैठकीत एमआयएमचे गटनेते रियाज खरादी यांनी यंदा मीना बाजार भरवू नये. बाजार भरवला तर लोक खरेदीसाठी गर्दी करतील. फिजिकल डिस्टन्सिंगचे तीन-तेरा होतील. समाजातील काही मान्यवरांचे हेच मत असल्याचे सांगितले होते. या मताला इतर नगरसेवकांनी पाठिंबा दिला होता.यादरम्यान मौलाना आझाद विचार मंचचे हसीब नदाफ यांनी सोशल मीडियावर ‘से नो टू ईद शॉपिंग’, ‘मेरी ईद सादगी से’ असे कॅम्पेन सुरू केले आहे. तरुणांनी या मोहिमेला प्रतिसाद दिल्याचे दिसून येते.

आम्ही प्रशासनासोबत-सलीम हिरोळी- लॉकडाऊन हा लोकांच्या भल्यासाठी आहे. आम्ही प्रशासनासोबत आहोत. मीना बाजार पब्लिक के लिए है... मगर अब पब्लिक की जान खतरे मे है... जान है तो जहान है... कोरोना हा संसर्गजन्य आजार आहे. मीना बाजार भरला तर लोक गर्दी करतील. जे नकोय तेच होईल. त्यामुळे यंदा मीना बाजार भरवायचा नाही, असा निरोप आम्ही सर्व व्यापाºयांना पाठवत आहोत. अनेक व्यापारी याला प्रतिसाद देत आहेत, असे मीना बाजार कमिटीचे माजी अध्यक्ष सलीम हिरोळी यांनी सांगितले

मीना बाजारबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र, यासंदर्भात पोलीस आयुक्तांसोबत चर्चा होणार आहे, त्यानंतरच निर्णय होईल.- दीपक तावरे, आयुक्त, महापालिका.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRamzan Eidरमजान ईदMarketबाजार