शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

coronavirus; ना खरेदी...ना बस्ता...ना वाजंत्री; साखरपुड्यातच उरकले लग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 16:29 IST

कोरोना व्हायरसमुळे घेतला निर्णय; पाच तासात उरकले लग्न आला फक्त साडेसात हजार खर्च 

ठळक मुद्दे- कोरोनाच्या दहशतीमुळे दोघां भावडांचे साखरपुड्यात उरकला विवाह- मंगल कार्यालय, लग्नपत्रिका अन् जेवणाची आॅर्डर केली रद्द- केवळ पन्नास लोकांना दिले जेवण उर्वरित पाहुण्यांना वाटली जिलेबी

इरफान शेख

कुर्डूवाडी : कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे कुर्डूवाडी शहरात दोन सख्ख्या चुलत भावांचा विवाह ठरलेल्या तिथीला न होता तातडीने साखरपुड्यात उरकण्यात आला. अवघ्या पाच तासात साखरपुड्यासह विवाह सोहळा संपन्न झाला़ यासाठी अवघा साडेसात हजार रुपये खर्च आला.

कुर्डूवाडी येथील संजय गाडेकर यांचा मुलगा योगेश याचा विवाह जयराम टाकसाळे (रा. आवर पिंपरी) यांची मुलगी ऋतुजा व गाडेकर यांचे सख्खे बंधू व गणेश गाडेकर यांचा मुलगा ईश्वर यांचा विवाह रामचंद्र दुधाळ (राहणार बार्शी) यांची मुलगी गौरी हिच्यासोबत १९ मे रोजी कुर्डूवाडी येथे ठरला होता़ त्यानुसार साखरपुड्यासाठी गौरी व ऋतुजा यांचे आई-वडील व ठराविक पाहुणे हे कुर्डूवाडी येथे दुपारी १ वाजता आले व अडीच वाजता दोघांचाही साखरपुडा झाला.

 या साखरपुड्यासाठी आलेली मंडळी सुधीर गाडेकर, भारत काळे,  ऋषिपाल वाल्मिकी, सुनील भोरे, संभाजी गोरे, नीलेश सुराणा, वसंत चौधरी, योगेश सुर्वेकर अशा मंडळींनी मध्यस्थी करून सध्या कोरोनाच्या साथीमुळे  विवाहास गर्दी करता येणार नाही असे आलेल्या पाहुण्यांना समजावून सांगितले व त्वरित लग्न करण्याचे ठरले़  लागलीच दुपारी ४ वाजता दोन्ही विवाह सोहळे अगदी साध्या पद्धतीने उरकण्यात आले.  केवळ आलेल्या  पन्नास पाहुण्यांना जेवण दोन्ही लग्नांमध्ये देण्यात आले व उरलेल्या सर्व पाहुण्यांना जिलेबीचे वाटप करून हा विवाह सोहळा पार पडला.--------------कोरोनाने जगभरातील स्थिती बिघडवून टाकली आहे़ आपल्या विवाह सोहळ्यासाठी होणाºया गर्दीमुळे पाहुण्यांना त्रास नको या भावनेतून हे शुभमंगल उरकण्यात आले़ यात कसलीही खरेदी नाही, बस्ता नाही, वाजंत्री, घोडे नाहीत, पाहुणे रावळे यांचा मानपान नाही.  विवाह सोहळ्यासाठी ठरवलेले मंगल कार्यालय, छापायला टाकलेल्या लग्नपत्रिका रद्द करण्यात आल्या़ नवरा नवरीनीही अगदी साधे घरगुती कपडे घातले होते.  मात्र सर्वांचाच उत्साह हा जोरात होता असा अभूतपूर्व लग्न सोहळा केवळ आणि केवळ कोरोनामुळेच घडला असल्याची चर्चा सर्व शहरात होती.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याmarriageलग्नHealthआरोग्य