मनपात सत्ताधारी भाजपवर नामुष्की, आरोग्य समिती सभापतींचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 01:03 PM2019-08-05T13:03:54+5:302019-08-05T13:07:37+5:30

सोलापूर महानगरपालिका; कार्यालयास जागा न मिळाल्याचे कारण

NMUSHKI, Health Committee Chairs Resignation | मनपात सत्ताधारी भाजपवर नामुष्की, आरोग्य समिती सभापतींचा राजीनामा

मनपात सत्ताधारी भाजपवर नामुष्की, आरोग्य समिती सभापतींचा राजीनामा

Next
ठळक मुद्दे- सोलापूर महानगरपालिकेतील राजकीय घडामोडी- सत्ताधारी भाजपवर नामुष्की, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण- सभापती राजेश काळे हे सहकारमंत्री सुभाष देशमुख गटाचे नगरसेवक

सोलापूर : सोलापूर महापालिकेतील सत्ताधारी भाजपवर पुन्हा नामुष्की ओढविली आहे. कार्यालयास जागा अथवा केबीन न दिल्याच्या कारणावरुन महापालिका आरोग्य समितीचे सभापती राजेश काळे यांनी सभापतीपदाचा राजीनामा महापालिकेचे आयुक्त दिपक तावारे यांच्याकडे दिला.

तीन महिन्यांपूर्वी राजेश काळे यांची निवड झाली होती. महापालिका आरोग्य समितीच्या सभापतीपद स्वीकारायला सत्ताधारी भाजपतील अनेक नगरसेवक तयार नव्हते. बºयाच घडामोडीनंतर नगरसेवक राजेश काळे यांना विचारणा करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी हे पद स्वीकारले होते. कार्यालयास जागा मागत होते़ परंतु, प्रशासनाने जागा आणि केबीन उपलब्ध करुन न दिल्याने काळे यांनी राजीनामा दिला आहे. काळे हे सहकारमंत्री सुभाष देशमुख गटाचे नगरसेवक आहेत. 

 

Web Title: NMUSHKI, Health Committee Chairs Resignation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.