शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

नव वधूवरांनी केला प्रशासनाला आहेर; कोव्हिड सेंटरलाही केली मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 13:05 IST

अनोख्या विवाह सोहळ्याची चर्चा; पंढरपुरात पार पडले तीन विवाह सोहळे

ठळक मुद्देअजित पवार यांचा विवाह सायली गोवर्धन तर सुधीर पवार यांचा विवाह ऐश्वर्या दल्लू यांच्याशी झालाया विवाहाप्रसंगी वधू-वरांनी मास्क परिधान केला होता. तसेच सामाजिक अंतर देखील ठेवले होतेनिवडक पाहुण्यांच्या उपस्थित अक्षदा सोहळा पार पाडला

पंढरपूर : उंबरगाव (ता. पंढरपूर) व पंढरपुरातील उपनगर परिसरातील इसबावी येथे तीन विवाह सोहळे सोशल डिस्टन्सची बंधने पळून पार पडले. या विवाह सोहळ्याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या प्रशासनातील अधिकाºयांनाच नवरा-नवरीनेच कोरोनाशी लढण्यासाठी आवश्यक असणाºया साहित्यांचा आहेर भेट दिला आहे.

उंबरगाव (ता. पंढरपूर) येथील  अरुण नामदेव पवार यांचे चिरंजीव अजित पवार व सुधीर पवार यांचा विवाह मोजक्याच लोकांच्या उपस्थित करण्याचे आयोजन केले होते. अजित पवार यांचा विवाह सायली गोवर्धन तर सुधीर पवार यांचा विवाह ऐश्वर्या दल्लू यांच्याशी झाला आहे.या विवाहाप्रसंगी वधू-वरांनी मास्क परिधान केला होता. तसेच सामाजिक अंतर देखील ठेवले होते. निवडक पाहुण्यांच्या उपस्थित अक्षदा सोहळा पार पाडला. यानंतर ग्रामपंचायतीच्यावतीने त्यांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आले. 

यानंतर दोन्ही वधु-वरांनी कोविड केअर सेंटरला उपयोगी पडेल, असे साहित्य गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांच्याकडे दिले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, ग्रामसेवक मुकरे, तलाठी व्यवहारे,  पोलीस पाटील सुरेश पवार, सरपंच विजय पवार, शहाजी पवार, नागनाथ चंदनशिवे, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

त्याचबरोबर पंढरपूर उपनगरातील इसबावी परिसरात अमोल मोहन चंदनशिवे व प्रियांका सागर गायकवाड यांचा मंगल परिणय झाला. यानिमित्त या वधू-वर रोख रक्कम पाच हजार रुपये पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांच्याकडे दिले. यावेळी कोवि ड वॉरियर्स विक्रम टिंगरे, सचिन  साबळे, दयानंद आटकळे, नगरसेवक प्रशांत मलपे, विनायक भांगे  उपस्थित होते.

सध्या कोरोना माहामारीचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून कोविड केअर सेंटर व कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखणाºया लोकांना मदत करा असे आवाहन  गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी केले आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरmarriageलग्नPandharpurपंढरपूरcorona virusकोरोना वायरस बातम्या