नवविवाहितेची आत्महत्या
By Admin | Updated: July 2, 2014 00:56 IST2014-07-02T00:56:00+5:302014-07-02T00:56:00+5:30
एक महिना आणि ६ दिवसांपूर्वी लग्न झालेल्या विवाहितेने मंगळवारी सकाळी गळफास लावून आत्महत्या केली

नवविवाहितेची आत्महत्या
सोलापूर : एक महिना आणि ६ दिवसांपूर्वी लग्न झालेल्या विवाहितेने मंगळवारी सकाळी गळफास लावून आत्महत्या केली. इंदुमती केदारनाथ कलशेट्टी (वय २०, रा. भारतरत्न इंदिरा नगर, सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे.
२४ मे रोजी इंदुमतीचा विवाह केदारनाथबरोबर झाले होते. याच सोहळ्यात नातेवाईकातील अन्य तीन जोडप्यांचा विवाह झाला होता. विडी घरकूलमध्ये तेल विक्रीचे दुकान असल्याने केदारनाथ हा सकाळीच तिकडे निघून गेला. त्यानंतर इंदुमतीने पंंख्याच्या हुकला साडीने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. शवविच्छेदनासाठी सदर बझार पोलिसांनी तिचे प्रेत शासकीय रुग्णालयात हलवले. इंदुमतीच्या भालकी येथील माहेरचे नातेवाईकही रुग्णालयात दाखल झाले. बराच वेळ त्यांचा गोंधळ सुरू होता. तिच्या आत्महत्येमागील नेमके कारण रात्री उशिरापर्यंत समजले नाही.
------------------
भावाशी बोलणे झाले...
केदारनाथ हा आपल्या पत्नीसोबत मधुचंद्रासाठी १५ जूनला रवाना झाला होता. उटी, म्हैसूर, मदुराई आदी शहरांचा दौरा करून दोघे २२ जूनला सोलापुरात परतले होते. आत्महत्या करण्याआधी एक दिवस (सोमवारी) तिने आपल्या भावाशी भ्रमणध्वनीवरून संपर्कही साधला होता.