शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

नवा ट्रेड; मॅचिंग मास्क महिलांचं नवं फॅशन स्टेटस बनलंय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 13:23 IST

कोरोनानंतरची परिस्थिती; मॅचिंगचे मास्कचे वेड पुरूषांनाही

ठळक मुद्देमहिलांमध्ये रंगीबिरंगी डिझाईन पैठणी पासून बनवलेले मास्क सध्या मार्केट मध्ये आकर्षण ठरत आहेसाडी घेतेवेळेस साडी आणि ब्लाउज सोबतच मास्कची खरेदी देखील करत आहेतअनेक दुकानांमध्ये साडीवर मॅचिंग असा मास्क देखील उपलब्ध करून दिला जात आहे

सोलापूर : कोरोना पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचा विचार करण्याबरोबर मॅचिंगचा मास्क घालण्याची फॅशन महिलांमध्ये फॅशन स्टेटस बनत चालला आहे. त्यामुळे मार्केटमध्ये मास्कच्या नवं नवीन व्हरायटी पाहायला मिळत आहे. मॅचिंग मास्क हा ट्रेंड महिलांसोबतच पुरुषवर्गातही मोठ्या प्रमाणात फॉलो केला जातोय. 

साडी, कुर्ता, ब्लाऊजला, ओढणीला मॅच होणारा मास्कचा वापर करताना सध्या दिसत आहेत. मास्क लावल्यानंतर चेहरा अर्धा झाकला जातो त्यामुळे पहिले लक्ष हे कपडे यापेक्षाही चेहºयावरील मास्ककडे जाते त्यामुळे नवनवीन डिजाईनचे मास्क वापण्याकडे नागरिकांचा कल दिसत आहे. विशेषत: लग्नसमारंभात नवरा- नावरीसाठी त्यांच्या पेहरावानुसार नवरीच्या पैठणी आणि मुलांच्या सदºयाला मॅच होणारा मास्क घालण्याचा फॅशन ट्रेंड पाहावयास मिळतोय.

महिलांमध्ये रंगीबिरंगी डिझाईन पैठणी पासून बनवलेले मास्क सध्या मार्केट मध्ये आकर्षण ठरत आहे. पूर्वी साडी घेताना महिला फक्त मॅचिंग ब्लाऊज घेत होत्या मात्र सध्या अनेक महिला साडी घेतेवेळेस साडी आणि ब्लाउज सोबतच मास्कची खरेदी देखील करत आहेत. त्यामुळे अनेक दुकानांमध्ये साडीवर मॅचिंग असा मास्क देखील उपलब्ध करून दिला जात आहे. सध्या बाजारात विविध कपड्यापासून आणि नक्षीदार काम केलेले मास्क देखील बाजारात उपलबध आहेत.

आहेरात आता मास्कचा समावेश...टोपी, टॉवेल आहेर करण्याची पद्धत देखील बदलली असून पूर्वी लग्नसमारंभ आणि कार्यक्रमात आलेल्या नागरिकांना आहेर म्हणून टोपी, टॉवेल देण्यात येत असे आता मात्र कोरोनाकाळामुळे नागरीकांत  टॉवेल अन टोपीसोबतच मास्कही दिला जात आहे. तर ओटी भरताना भेट म्हणून मास्क आणि अक्षतांबरोबर मास्क  देण्यात येत आहे त्यामुळे नवा ट्रेंड सुरु होताना दिसत आहे.

सध्या कोरोनामुळे  मानवाच्या अनेक सवयी बदलत आहेत त्यानुसार महिलांमध्ये साडीसोबत मॅचिंग मास्कची मागणी वाढली आहे. नव्या ट्रेंडनुसार आम्ही ग्राहकांना साडीवर मॅचिंग मास्क देत आहोत. - लक्ष्मीकांत चाटला, व्यापारी

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याfashionफॅशन