शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
3
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
4
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
5
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
6
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
7
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
8
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
9
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
10
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात
11
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
12
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
13
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
14
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
15
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
16
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
17
आता पाहा, मित्र-मित्रच एकमेकांना कापताना दिसतील!
18
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
19
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
20
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

नवे उद्योग, विमानसेवा केव्हा येणार सोलापुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 16:09 IST

जनतेच्या जिव्हाळ्याच्या विषयाचा ‘लोकमत’ने घेतलेला आढावा; तज्ज्ञ म्हणतात, शहर धुमसतंय, जागे व्हा

ठळक मुद्देशहरातील शेकडो मुले रोजगारासाठी पुणे, मुंबईत, हैदराबादेत स्थायिक झालीपुण्यात तर पुणेरी सोलापूर ही संघटना तयार होत आहे सोलापुरातून दरवर्षी होणारे स्थलांतर रोखण्यासाठी या शहरात नवे उद्योग यायला हवेत

राकेश कदम 

सोलापूर : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेतून शहरात पायाभूत सुविधांची कामे सुरू आहेत. पण शहर आणि जिल्ह्याच्या आर्थिक विकासाचे नियोजन अद्याप झालेले नाही. जिल्ह्यातून दरवर्षी हजारो गुणवान तरुण-तरुणी पुण्याला स्थलांतरित होत आहेत.  आयटी पार्क, टेक्स्टाईल पार्क, विडी उद्योग आणि साखर कारखान्यातील कंत्राटी कामगारांची अडचण हे विषय गंभीर होत असले तरी निवडणुकीच्या प्रचारात या मुद्यांना दुय्यम स्थान मिळत आहे. त्यावर सामाजिक क्षेत्रातील मंडळींनी नाराजी व्यक्त केली आहे. पाणी ही जिल्ह्याच्या आणि शहराची प्रमुख गंभीर समस्या आहे. उजनी धरणावरचा ताण वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येनुसार उजनी धरणातील पाणी कमी पडणार आहे. 

कृष्णा खोºयातील अतिरिक्त पाणी उजनी धरणात वळवू. केंद्र शासनाकडे पाठपुरावा करू हा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी नाही. यंत्रमाग उद्योग अडचणीत असल्याने कामगारांवर टांगती तलवार आहे. 

केंद्राच्या नव्या धोरणामुळे विडी कामगारांवर कोणत्याही क्षणी गंडांतर येऊ शकते. शहरात मंजूर झालेल्या टेक्स्टाईल पार्कचे काय झाले, नवे पार्क कधी येणार? याची फारशी चर्चा प्रचारात नाही. रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. मागील काळात यासाठी काय प्रयत्न झाले आणि पुढील काळात आम्ही काय करु याचाही ऊहापोह व्हायला हवा.

 लोकसभेची निवडणूक लढविणाºया काही उमेदवारांना येथील मूळ प्रश्न माहीत नाही. देव, धर्म, कथित राष्ट्रभक्ती यावरच प्रचाराचा जोर आहे. उद्या निवडणूक संपल्यानंतर धर्म-राष्ट्रभक्ती नव्हे तर पाणी आणि रोजगाराचा विषय महत्त्वाचा असेल. 

तज्ज्ञ म्हणतात...राजकीय नेत्यांनी नव्या उद्योगांबरोबरच  बार्टी, यशदा सारख्या प्रशिक्षण संस्था सोलापुरात याव्यात. सोलापूरसाठी स्वतंत्र खंडपीठ व्हावे, वर्किंग वूमनसाठी शेल्टर्स सुरू व्हावेत, उजनी धरणाचे प्रदूषण कमी व्हावे या मुद्द्यांवर बोलायला हवे. पाणी ही गंभीर समस्या आहे. पण धर्माच्या प्रचारात ती बाजूलाच ठेवली. - अ‍ॅड़ सरोजनी तमशेट्टी, विधी सल्लागार, सूर्यतारा म.ब. विकास सं. 

सोलापूरची परिस्थिती समजून घेऊनच निवडणुकीचा प्रचार व्हायला हवा. केवळ तरुणच नव्हे तर कष्टकरी माणसेही आता स्थलांतरित होत आहेत. टेक्स्टाईल पार्कविषयी खूप बोलले गेले.पण त्याविषयी काही झाले नाही. अशा विविध मुद्द्यांचा ऊहापोह निवडणुकीच्या प्रचारात व्हायला हवा. त्याऐवजी वेगळ्याच मुद्द्यांवर प्रचार सुरू आहे.- प्रा. विलास बेत, सामाजिक कार्यकर्ते.

आतापर्यंत काय झाले उपाय?1 सोलापूर- पुणे चौपदरीकरण झाले. पण सोलापूर-हैदराबाद रस्त्याचे चौपदरीकरण खूपच संथगतीने सुरू आहे. सोलापूर-कोल्हापूर, सोलापूर-विजापूर चौपदरीकरणाच्या कामातही अपेक्षित गती दिसत नाही.    2 उजनीमुळे जिल्ह्यात साखर कारखानदारी वाढली. पण केंद्र सरकारच्या धोरणामुळे साखर उद्योग अडचणीत आला. हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक अडचणीत आली. 3 २००४ पासून आतापर्यंत शहरात नवे उद्योग आणण्याच्या बाता मारण्यात आल्या. प्रत्यक्षात त्यादृष्टीने विशेष हालचाली झाल्या  नाहीत.  

तज्ज्ञांना काय अपेक्षित आहे?1 सोलापुरातून दरवर्षी होणारे स्थलांतर रोखण्यासाठी या शहरात नवे उद्योग यायला हवेत. सध्या कार्यरत असलेल्या उद्योगातील कामगारांचे शोषण थांबायला हवे.    2 विडी उद्योग, यंत्रमाग, साखर कारखान्यातील हंगामी कामगारांसह कंत्राटी कामगारांच्या भवितव्यासाठी महत्त्वपूर्ण काम व्हायला हवे. या कामगारांच्या कुटुंबीयांसाठी स्वस्तात शिक्षण, आरोग्याच्या सुविधा मिळायला हव्यात. 3 उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनी, विमानसेवा हे विषय तातडीने मार्गी लागायला हवेत. 

पुणेरी सोलापूरकर !शहरातील शेकडो मुले रोजगारासाठी पुणे, मुंबईत, हैदराबादेत स्थायिक झाली आहेत. पुण्यात तर पुणेरी सोलापूर ही संघटना तयार होत आहे. हे स्थलांतर बंद व्हायला हवे. 

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsolapur-pcसोलापूरSmart Cityस्मार्ट सिटीbusinessव्यवसाय