शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

‘या’ जिल्ह्यात होणार नवीन इंजीनिअरिंग कॉलेज सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 10:37 IST

मुंबईत झाली बैठक: उच्च व तंत्रशिक्षण मत्र्यांनी दिले संकेत

ठळक मुद्देसोलापुरात शासकीय तंत्रनिकेतन सन १९५६ पासून सुरू नवीन शैक्षणिक वषार्पासून तंत्रनिकेतनच्या आवारातच अभियांत्रिकी कॉलेज अभियांत्रिकी कॉलेज सुरू करण्याच्या सूचना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री यांनी दिल्या

सोलापूर : सोलापुरातील शासकीय तंत्रनिकेतन बंद न करता याच इमारतीच्या आवारात नवीन अभियांत्रिकी कॉलेज सुरू करण्यात येईल अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मुंबईतील बैठकीत दिली.  

सोलापुरातील शासकीय तंत्रनिकेतनसंदर्भात आमदार प्रणीती शिंदे यांनी लक्ष वेधले होते. त्यावर मुंंबईत मंत्रालयात गुरूवारी बैठक झाली. या बैठकीला आमदार प्रणिती शिंदे, उच्च व तंत्रशिक्षण सचिव सौरव विजय, सहसंचालक प्रमोद नाईक, शासकीय तंत्रनिकेतनचे प्रा. चितळांगे, वैभव शेलवाले, वैभव ख्याडे, माधव  नरसाने, शुभम नालवाडे, अनिकेत वाकुडे उपस्थित होते.

शासनाने २0१५ मध्ये सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी कॉलेज सुरू करण्याचा निर्णय घेताना तंत्रनिकेतनचा अभ्यासक्रम हा टप्प्याटप्प्याने बंद करण्याचे ठरविले होते.  हा निर्णय चुकीचा व गरीब विद्यार्थ्यांवर अन्यायकारक असून शासकीय तंत्रनिकेतन बंद करू नये अशी मागणी विविध संघटना व पालकांनी निवेदनाद्वारे मागणी केली होती. शासकीय तंत्रनिकेतनमधील पदविका अभ्यासक्रम बंद केला गेला असता तर गरीब व हुशार विद्यार्थ्यांना खासगी तंत्रनिकेतनमध्ये मोठे शैक्षणिक शुल्क भरून प्रवेश घ्यावा लागला असता याकडे आमदार शिंदे यांनी लक्ष वेधले.  

तंत्रनिकेतनमध्येच अभियांत्रिकी कॉलेजसोलापुरात शासकीय तंत्रनिकेतन सन १९५६ पासून सुरू आहे.  तंत्रनिकेन ३२ एकरात वसले आहे. या ठिकाणी स्थापत्य, संगणक, विद्युत, अणुविद्युत व दूरसंचारण, यंत्र, माहिती तंत्रज्ञान व वस्त्रनिर्माण असे पदविका अभ्यासक्रम  सुरु आहेत. या ठिकाणी वस्त्रोद्योगचा अभ्यासक्रम आहे. हा अभ्यासक्रम सुरूच ठेवण्यात येईल व नवीन शैक्षणिक वषार्पासून तंत्रनिकेतनच्या आवारातच अभियांत्रिकी कॉलेज सुरू करण्याच्या सूचना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री सामंत यांनी संबंधीत अधिकाºयांना दिल्या. 

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणUday Samantउदय सामंतPraniti Shindeप्रणिती शिंदेcollegeमहाविद्यालय