शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

केंद्र सरकारचे नवीन व्यापक धोरण पाच दिवसात जाहीर होणार, पाशा पटेल यांची सोलापूर माहिती, सोलापूर बाजार समितीत सायंकाळच्या सौदे बाजार शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 16:13 IST

तूर,उडीद,मूग,सोयाबीन,हरभरा आणि भुईमूग या पिकांच्या किमान आधारभूत किमतींबाबतचे केंद्र सरकारचे नवीन व्यापक धोरण येत्या पाच दिवसात म्हणजेच शुक्रवारी जाहीर होणार आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच शेतक-यांचा विचार एखादे सरकार करत आहे.

ठळक मुद्देतूर,मूग,सोयाबीन,उडीद,हरभरा,भुईमूग पिकांना किमान आधारभूत किंमत  देशात सुमारे १४ लाख हेक्टरवरील सोयाबीनचा पेरा कमी झाला  शेतकरी केंद्रबिंदू मानून व्यापारी त्याच्या मालाला चांगला भाव देतात रात्रीच्या लिलाव बाजाराचा शुभारंभ तसेच आर. ओ. प्लांटचा लोकार्पणही करण्यात आला़

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ६ : तूर,उडीद,मूग,सोयाबीन,हरभरा आणि भुईमूग या पिकांच्या किमान आधारभूत किमतींबाबतचे केंद्र सरकारचे नवीन व्यापक धोरण येत्या पाच दिवसात म्हणजेच शुक्रवारी जाहीर होणार आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच शेतक-यांचा विचार एखादे सरकार करत आहे.या धोरणानंतर देशातील शेतक-यांना माणूस म्हणून जगण्याची संधी  असल्याचे महाराष्ट्र राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशाभाई पटेल यांनी सांगितले.       सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळे आणि भाजीपाला या नियंत्रित शेतीमालाचा सायंकाळच्या लिलावाचा शुभारंभ सोमवारी बाजार समिती परिसरातील कांदा सेल हॉल येथे पटेल यांच्या हस्ते करण्यात आला , त्यावेळी ते बोलत होते. महापौर शोभा बनशेट्टी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी व्यासपीठावर बाजार समितीचे माजी  संचालक ,शहाजी पवार, देशमुख,बाजार समितीचे प्रशासक कुंदन भोळे, प्रभारी सचिव विनोद पाटील,नानासाहेब देशमुख,रियाज बागवान,राजन जाधव,केदारनाथ उंबरजे,जगन्नाथ सिंदगी , प्रभुराज विभुते,महालिंगप्पा परमशेट्टी, ओसवाल,सिद्रामप्पा नरोणे,बाळू करवा,यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.  पाशा पटेल म्हणाले,गडकरी,रामविलास पासवान आणि राधामोहन सिंग यांच्यासह विविध खात्याच्या सचिवांची  एकत्रित बैठक नुकतीच झाली आहे. त्या बैठकळीला आपण स्वत: उपस्थित होतो. तूर,मूग,उडीद,भुईमूग,सोयाबीन,हरभरा या पिकांचे देशातील एकूण उत्पादन किती,गरज किती,राज्य सरकारने दराबाबत केलेली शिफारस याचा ताळमेळ घालून केंद्र सरकार येत्या पाच दिवसात किमान आधारभूत किमतीबाबत आपले नवीन व्यापक धोरण जाहीर करणार आहे. सप्टेंबर महिन्यात तूर,मूग आणि उडीद यावरील निर्यातबंदी उठविण्यात आली आहे. लवकरच  हरभरा आणि मसूर या डाळींवरीलही निर्यातबंदी उठणार आहे. गेल्या बारा वर्षात चुकलेली घडी दुरुस्त करणार आहोत.स्वातंत्र्यानंतर शेतक-यांसाठी असा पहिलाच हा निर्णय असल्याचेही त्यांनी सांगितले.      पीक काढणीनंतर व्यवस्था नसल्याने देशात शेतकरी आणि व्यापारी यांचे वषार्काठी सुमारे १ लाख कोटी रुपयांचे नुकसान होते. स्थापन करण्यात आली आहे. सहा महिने राज्यातील सर्व पिकांच्या ८० शेतकरी प्रतिनिधींबरोबर बोलून प्रस्ताव तयार केला आहे. त्यावर कायदा होणार असून उत्पन्न दुप्पट होण्यासाठी या कायद्याचा उपयोग होणार असल्याचे पटेल यांनी यावेळी बोलताना सांगितले.        देशात सुमारे १४ लाख हेक्टरवरील सोयाबीनचा पेरा कमी झाला आहे. मध्य प्रदेशात हा पेरा ७३ लाख हेक्टरवरून ५३ लाख हेक्टरवर आला आहे असेही त्यानीं सांगितले.   शेतकरी केंद्रबिंदू मानून व्यापारी त्याच्या मालाला चांगला भाव देतात. व्याप-यांना त्याचा हक्क आणि शेतक-यांना न्याय मिळाला पाहिजे .  पणनमंत्री सुभाष देशमुख आपल्या अडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध आहेत. कोणाचाही व्यापार बुडावा आणि कोणाची गळचेपी होणार नाही असे सांगतानाच व्यापा-यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही न्यायालयात ११० पिटिशन दाखल केले असल्याचे शहाजी पवार यांनी सांगितले.         यानिमित्ताने पाशाभाई पटेल आणि मान्यवरांच्या हस्ते रात्रीच्या लिलाव बाजाराचा शुभारंभ तसेच आर. ओ. प्लांटचा लोकार्पणही करण्यात आला़ याप्रसंगी एन.एम खलिफा, अप्पासाहेब उंबरजे,राईस बागवान , सिद्धाराम तंबाके,सादिक बागवान,महालिंग परमशेट्टी , दिनेश उपासे,नारायण माशाळकर , श्रीमंत बंडगर,मुश्ताक चौधरी,त्रिंबक मुसळे,एस,एम , पौळ ,शिवानंद दरेकर यांच्यासह याडार्तील व्यापारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्पिता खडकीकर यांनी केले तर आभार प्रभारी सचिव विनोद पाटील यांनी मानले.