ग्रामपंचायतीनं उचलला झेडपीचा भार
करकंब : नेमतवाडी ते करकंब रस्त्यावर असलेली चारी नेमतवाडी ग्रामपंचायतीने बुजवून झेडपीकडे असलेल्या रस्त्याचा भार उचलल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
नेमतवाडी ते करकंब रस्त्याची खड्ड्याने चाळण झाली आहे, अशातच नेमतवाडीजवळ एका नामांकित कंपनीने रस्त्यावर चारी घेतली आहे. परिणामी सतत पडलेल्या रिपरिप पावसामुळे चारीला खड्ड्याचे स्वरूप निर्माण झाले आणि त्यामध्ये जड वाहतूक करणारी व चारचाकी वाहने अडकू लागली, त्यामुळे अनेक वाहनांचे नुकसानही झाले.
एक दिवस तर भरतीचे वाहन त्या खड्ड्यात अडकल्याने वाहनाचे नुकसान तर झालेच, शिवाय तीन तास वाहन रस्त्यावरील चारीत अडकल्याने चारचाकी वाहने तेथून काढणे मुश्कील झाले आणि प्रवाशांची दमछाक झाली. ‘रस्त्यावरील चारी, नुकसान करते भारी’ या मथळ्याखाली हे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. नेमतवाडीचे सरपंच प्रतिनिधी गोरख खुळे यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून खड्डामय बनलेली चारी मुरूम टाकून बुजवून घेतली.
---
फोटो : २८ करकंब
नेमतवाडी-करकंब रस्त्यावर धोकादायक असलेली चारी मुरूम टाकून बुजविली.