धनगर समाज आरक्षणाला अराजकीय नेतृत्वाची गरज
By Admin | Updated: October 22, 2015 21:13 IST2015-10-22T21:13:27+5:302015-10-22T21:13:27+5:30
सत्तेत आल्यास १५ दिवसांत आरक्षण देऊ असे म्हणणारे आता सत्तेची फळे चाखत असताना १५ महिने लोटले तरी धनगर समाज दिले नाही.

धनगर समाज आरक्षणाला अराजकीय नेतृत्वाची गरज
मोहोळ : सत्तेत आल्यास १५ दिवसांत आरक्षण देऊ असे म्हणणारे आता सत्तेची फळे चाखत असताना १५ महिने लोटले तरी धनगर समाज दिले नाही. त्यांना स्मरण करुन देण्यासाठी पुन्हा धनगर समाज अराजकीय नेतृत्वाची गरज असल्याचे सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. बाबासाहेब बंडगर यांनी सांगितले.
ऑल इंडिया धनगर समाज महासंघ व अखिल महाराष्ट्र धनगर समाज विकास संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने धनगर समाजाशी निगडित आरक्षण व पुणे येथे होणार्या वधू-वर सूचक मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष अंकुशराव भांड, जिल्हा अध्यक्ष अनंता नागणकेरी, तालुकाध्यक्ष तात्या पाटील, शहराध्यक्ष रावसाहेब चोरमोले, तुळशीराम नरुटे, महादेव गावडे, अँड. जयदीप दाईंगडे-पाटील, अँड. हणमंत टेकाळे, माणिक गावडे, मालतीताई टेळे, दाजी खांडेकर, अशोक बरकडे, वसंत बरकडे, गोविंद घागरे, आबा बरकडे, दिनेश गाढवे, सुरेश गाढवे, भुजंगा मळगे, रामदास काळे, नागेश तितर, आबा चेंडगे, नागेश वाघमोडे, ढेरे-पाटील, विजय लवटे, नेमिनाथ पडवळकर, महादेव महानवर, अमोल काळे, बजरंग डेगळे उपस्थित होते. (वार्ताहर)