शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

यश मिळविण्यासाठी या पाच गोष्टीचा आहे गरज !

By appasaheb.patil | Updated: November 30, 2018 16:14 IST

यश म्हणजे काय हे न समजताच, जीवनात प्रत्येकाला यशस्वी व्हायचे असते. यश ही एक वृत्ती असते, घटना नसते. प्रत्येक ...

यश म्हणजे काय हे न समजताच, जीवनात प्रत्येकाला यशस्वी व्हायचे असते. यश ही एक वृत्ती असते, घटना नसते. प्रत्येक धंद्यात आणि संस्थेत अशी परिस्थिती येत असते की जी हाताळायचे कौशल्य तुमच्यात असावे लागते. हे कौशल्य आपल्या आतून येते आणि त्या आतल्या जागेला मी 'अध्यात्मिक' म्हणतो. यश मिळविण्यासाठी पाच गोष्टींची गरज असते.

१. अनुकूल वातावरण : शांतता आणि भरभराट या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या असतात. अस्वस्थ वातावरणात भरभराट होऊ शकत नाही. इतरांबरोबर काम करताना सुद्धा तुम्हाला संघभावनेने काम करावे लागते. तुमच्या गटातील सर्वाशी आदराची भावना ठेवा आणि इतरांवर खापर फोडण्याच्या भानगडीत अडकू नका. आणि आणखी एक म्हणजे गटाच्या नेत्याने उत्सवाचे, विश्वासाचे, सहकार्याचे आणि आपलेपणाचे वातावरण ठेवावे. जर सगळे लक्ष फक्त उत्पादन आणि निव्वळ नफा यावर असेल तर काहीच होणार नाही. लोकांच्या मनात आतूनच स्फूर्ती निर्माण करणे हीच सर्वात परिणामकारक क्लुप्ती आहे.

२. कामातील कौशल्य : कर्माच्या फळामध्ये गुंतून न राहणे हेच भगवद्गीतेचे सार आहे. जर एखाद्या युद्धजन्य परिस्थितीत तुम्ही तुमच्या मनाला सावरू शकत असाल तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीला सांभाळून घेऊ शकता. कर्माच्या या कौशल्याला 'योग' म्हणतात. योगाच्या या कौशल्यामुळेच उद्धटपणा-आत्मविश्वासात, लीनता-नम्रतेत, परावलंबित्व-परस्परावलंबनाची जाणीव होण्यात आणि मर्यादित मालकीची भावना पूर्णत्वात,एकत्वाची भावना निर्माण होण्यात परिवर्तीत होते. काम करत असताना जर सगळे लक्ष जर फक्त अंतिम निकालावर असेल तर तुम्ही काम करू शकत नाही. फक्त जे काम करत आहात त्यात तुम्ही प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने १०० टक्के द्या.  

३.    सिंह होणे : संस्कृतमध्ये एक म्हण आहे, ज्याच्याकडे सिंहासारखे धैर्य असेल त्याच्याकडे मोठी संपत्ती चालून येते. आत आणि बाहेर जाणाºया श्वासाइतकेच आस्था आणि वैराग्य हे दोन्ही एकमेकाला पूरक आहेत. तुम्ही श्वास आत घेता पण तो जास्त काळ आत रोखून धरू शकत नाही, तुम्हाला तो बाहेर सोडावाच लागतो. त्याचप्रमाणे गोष्टी घडण्यासाठी तुम्हाला आस्था असावी लागते तसेच सोडून देण्यासाठी वैराग्य असावे लागते. जेव्हा तुम्हाला भरभराटीची हाव नसते तेंव्हा ती तुमच्याकडे चालून येते.  

४. नशिबाचा एक अंश : सुबत्ता प्राप्त होण्यासाठी जर केवळ स्वत:च्या मेहनतची गरज असेल तर असे अनेक लोक कां आहेत जे खूप मेहनत करतात पण त्यांची भरभराट होत नाही? ही अगम्य गोष्ट किंवा नशीब अध्यात्माने उचलून धरली आहे. सगळी भौतिक सृष्टी लहरींच्या एका नियमाने चालते जी आपल्याला दिसते त्यापेक्षा सूक्ष्म आहे. अध्यात्मामुळे बुद्धीला आणि अंतज्ञार्नाला धार चढते. जेंव्हा तुम्ही आस्था आणि वैराग्य यात समतोल साधता तेव्हा तुम्हाला अंतर्ज्ञान प्राप्त होते. फायद्याबरोबरच सेवा, गोष्टी मिळविण्यासाठीची धडपड आणि त्याच बरोबर समाजाला परत देण्यासाठीची करुणा. अंतर्ज्ञान म्हणजे योग्य वेळी योग्य विचार येणे आणि हाच व्यवसायात यश मिळण्यासाठी असलेला एक महत्वाचा घटक आहे.

५.     ध्यान : तुमच्या जबाबदाºया आणि ध्येय जितके मोठे तितकी तुम्हाला ध्यान करण्याची जास्त गरज असते. प्राचीन काळी ध्यान हे आत्म्याच्या शोधासाठी, सिद्धी प्राप्त होण्यासाठी आणि दु:ख आणि त्रासावर मात करण्यासाठी वापरले जायचे. आजच्या काळात मनावरचा ताण,समाजातील तणाव यासाठीही ध्यान करावे लागते. करायचे खूप असते आणि वेळ थोडा असतो आणि तेवढी शक्ती नसते.

६.  तुम्ही तुमच्या कामाचा भारही कमी करू शकत नाही आणि वेळही वाढवू शकत नाही. पण तुम्ही तुमची शक्ती, ऊर्जा वाढवू शकता. ध्यानामुळे तुमचे तुमचा ताण तणाव नाहीसा होतो इतकेच नाही तर तुमच्या क्षमताही वाढतात, तुमची मज्जासंस्था आणि मन बळकट होते.शरीरातील विषारी द्रव्यांचा निचरा होतो आणि सर्व प्रकारे तुमचे तेज वाढते. आपण जड मूलतत्व आणि चैतन्य या दोन्हीपासून बनलो आहोत. शरीराच्या काही भौतिक गरजा असतात आणि आपल्या आत्म्याचे पोषण अध्यात्माने होते. सर्वात महत्वाचे म्हणजे आनंदाने बहरून जाणे, आत्मविश्वास, करुणा,उदारपणा आणि कोणीही घालवू शकणार नाही असे स्मित हास्य हीच यशाची खूण आहे. जीवनात काहीही झाले तरी या गोष्टी तुम्ही टिकवू शकलात तर तुम्ही खºया अर्थाने यश मिळवले आहे.

टॅग्स :Solapurसोलापूर