पाकणीजवळ ३६ लाखाचा गुटखा जप्त, सोलापूर तालुका पोलीसांची कारवाई, दोघांना घेतले ताब्यात

By Admin | Updated: April 8, 2017 19:23 IST2017-04-08T19:23:14+5:302017-04-08T19:23:14+5:30

.

Near the Pakani, 36 lakhs of gutkha seized, Solapur taluka police action, both took possession | पाकणीजवळ ३६ लाखाचा गुटखा जप्त, सोलापूर तालुका पोलीसांची कारवाई, दोघांना घेतले ताब्यात

पाकणीजवळ ३६ लाखाचा गुटखा जप्त, सोलापूर तालुका पोलीसांची कारवाई, दोघांना घेतले ताब्यात


आॅनलााइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ८ : हैद्राबादहुन मुंबई (वाशी) कडे जाणाऱ्या ट्रकमधील ३६ लाखांचा गुटखा, ट्रक असा ४३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला़ ही कारवाई सोलापुर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील पाकणीजवळ सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने केली़
दरम्यान, हैद्राबादहुन एमएच १२ एफझेड ७४८२ या ट्रकमधून एक्का ए १ प्रिमियम एक्सपोर्ट कंपनीचा ३६ लाखाचा गुटखा मुंबई कडे जात होता़ याबाबत सोलापूर तालुका पोलीसांना गोपनीय माहिती मिळाली होती़ या माहितीच्या आधारे तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांच्या टिमने संबंधित गुटखा वाहतुक करणाऱ्या ट्रकला पाकणीजवळ पकडले़ याप्रकरणी चालक अजमोद्दीन पाशा पटेल (वय २४ रा़ कप्परगांव, ता़ हुमनाबाद, जि़ बिदर) तर क्लिनर पाशाबाई या दोघांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे़ ही कारवाई पोलीस अधिक्षक एस़ विरेश प्रभू, उपविभागीय पोलीस अधिकारी अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस निरीक्षक किशोर नावंदे, पोलीस उपनिरीक्षक विकास घुगे, हेकॉ श्रीकांत गायकवाड, योगेश वानखेडे, एस़ डी़ चौरे आदींनी केली़ या कारवाईनंतर अन्न व औषध प्रशासन अधिकारी निलेश मसारे यांच्या पथकाने सदर गुटखा पुढील कारवाईसाठी ताब्यात घेतला आहे़

Web Title: Near the Pakani, 36 lakhs of gutkha seized, Solapur taluka police action, both took possession