बेगमपूर ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:43 IST2021-02-05T06:43:35+5:302021-02-05T06:43:35+5:30
चौधरी गटाचे अस्लम चौधरी हे १९९५ पासून सलग सहाव्यांदा तर महाआघाडीकडून विद्यमान सरपंच हरीभाऊ काकडे दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. ...

बेगमपूर ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व
चौधरी गटाचे अस्लम चौधरी हे १९९५ पासून सलग सहाव्यांदा तर महाआघाडीकडून विद्यमान सरपंच हरीभाऊ काकडे दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. माजी सरपंच पांडुरंग काकडे यांचा गट मागील दोन निवडणुकीपासून चौधरी यांच्यापासून अलिप्त होता.
सर्वपक्षीय महाविकास आघाडीकडून जिल्हा परिषदेच्या सदस्या शैला गोडसे यांनीही या निवडणुकीत मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेत पदयात्रेद्वारे निवडणूक प्रचारात सहभाग घेतला होता. तरीही यावेळी मतदारांनी सत्ताधारी महाआघाडीला नाकारले.
विजयी उमेदवार असे: अस्लम चौधरी, केशव काकडे, आरिफ पठाण, संतोष सोनवले, अश्विनी म्हेत्रे, किशोरी कसबे, वंदना सपाटे, श्रद्धा कुलकर्णी, उमाश्री भोई, सिंधू भोई.
सत्ताधारी महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार असे: हरिभाऊ काकडे, जाविद शेख , शीतल मंडले.
विजयी झालेल्या उमेदवारांचे गावात आगमन झाल्यावर गुलालाची उधळण करीत कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले. सर्व उपस्थितांचे माजी सदस्य दत्तात्रय चव्हाण यांनी आभार मानले.
-----