शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चार महिन्यात सोलापूरला राष्ट्रवादीचा तिसरा पालकमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 14:16 IST

सोलापूरच्या पालकमंत्री पदी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची नियुक्ती: गुरूवारी घेणार 'कोरोना'चा आढावा

ठळक मुद्देदत्तात्रय भरणे इंदापूरचे आमदार अन् ठाकरे सरकारमधील राज्यमंत्रीउद्या सोलापुरात दाखल होणार असून विविध विभागाच्या बैठका घेणारराज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय

सोलापूर : चार महिन्यात सोलापूरला राष्ट्रवादी काँग्रेसचा तिसरा पालकमंत्री मिळाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूरचे आमदार तथा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची सोलापूरच्या पालकमंत्री बुधवारी नियुक्ती केली आहे.राज्यात महाआघाडीचे सरकार सत्तेवर आल्यावर सोलापूरचे पालकमंत्री म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे निकटवर्तीय कामगार मंत्री दिलीप वळसे—पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. दोन महिने त्यांचा कार्यकाल चालल्यानंतर कोरोनाची साथ सुरू झाली. या साथीच्या उपाययोजनेबाबत वळसे—पाटील यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारेच प्रशासनाकडून दोनदा आढावा घेऊन सूचना दिल्या. प्रकृती अस्वास्थामुळे सोलापुरात येऊन कामकाज करणे अशक्य असल्याने त्यांनी कळविल्यावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची सोलापूरचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यावर आव्हाड यांनी तातडीने सोलापुरात येऊन जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना साथीच्या प्रतिबंधासाठी केलेल्या उपाययोजनेचा आढावा घेतला. त्यानंतर मुंबईला परतल्यानंतर आव्हाड यांनी स्वत:ला होम कोरंनटाईन करून घेतल्याचे सांगण्यात आले. अशात मंगळवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

इकडे सोलापुरात कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांची संख्या वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. साथीवर नियंत्रण आणण्यासाठी करावयाच्या उपाययोजनेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी पालकमंत्र्यांची गरज भासू लागल्याची मागणी वाढल्यावर तिसरा नवीन पालकमंत्री नियुक्त करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी घेतला. त्यानंतर बुधवारी राज्याचे सचिव अंशू सिन्हा यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा सोलापूरचे पालकमंत्री म्हणून नियुक्तीचा आदेश जारी केला आहे.  

तातडीने बैठक घेणार

महाआघाडी सरकारच्या कारकीर्दीत सोलापूरचे तिसरे पालकमंत्री म्हणून पदभार घेणारे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे गुरूवारी तातडीने सोलापुरात दाखल होणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना साथीच्या प्रतिबंधासाठी करण्यात येणाºया उपाययोजनांचा आढावा घेणार असल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :SolapurसोलापूरJitendra Awhadजितेंद्र आव्हाडindapur-acइंदापूरAjit Pawarअजित पवार