अंकोली ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीच्या राजन पाटील गटाचे वर्चस्व कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:22 IST2021-01-20T04:22:46+5:302021-01-20T04:22:46+5:30

कुरुल : मोहोळ तालुक्यातील अंकोली ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत राजन पाटील गटाचे नेते अशोक क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीत भैरवनाथ ...

NCP's Rajan Patil faction continues to dominate Ankoli Gram Panchayat | अंकोली ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीच्या राजन पाटील गटाचे वर्चस्व कायम

अंकोली ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीच्या राजन पाटील गटाचे वर्चस्व कायम

कुरुल : मोहोळ तालुक्यातील अंकोली ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत राजन पाटील गटाचे नेते अशोक क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीत भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलने ११ पैकी ८ जागांवर विजय मिळवून वर्चस्व कायम ठेवले. विरोधी गटाला तीन जागांवर समाधान मानावे लागले. विद्यमान सरपंच व लोकनेते शुगरचे संचालक संदीप पवार हे ही विजयी झाले.

भैरवनाथ पॅनेलचे उमेदवार कौताबाई गायकवाड, समाधान गायकवाड, नेताजी पवार, अजिंक्य क्षीरसागर, विजयमाला पवार, दीपकुमार पवार, पांडुरंग येळवे, मैना पवार विजयी झाले. विरोधी गटातून तीन उमेदवार विजयी झाले आहेत. लक्ष्मी आवताडे, शुभांगी सुरवसे, मनीषा भालेराव हे तीन उमेदवार विजयी झाले.

मतमाेजणीदरम्यान मार्केट कमिटीचे संचालक अशोक क्षीरसागर, माजी सभापती बाबासाहेब क्षीरसागर, सरपंच संदीप पवार, नागनाथ पवार, गोरख पवार, काका पाटील, विजयसिंह पाटील, अशोक डोके, शिवमूर्ती पवार, भगवान पवार, तुळशीराम पवार, राजाराम पवार, नानसाब पवार, राजेंद्र घाडगे, सज्जन घाडगे, जालिंदर गोडसे, आबासाहेब माळी मान्यवर उपस्थित होते.

----

फोटो : १९ अंकोली

अंकोली ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयी उमेदवार व पॅनेलचे प्रमुख.

Web Title: NCP's Rajan Patil faction continues to dominate Ankoli Gram Panchayat