शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या नाराज गटाने घेतली शरद पवार यांची भेट; जिल्हा नेतृत्वाबद्दल तक्रारीचा पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2021 18:29 IST

मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी दोन टी.एम.सी. पाण्याच्या तरतूदी बाबत कृतज्ञता

मंगळवेढा /मल्लिकार्जुन देशमुखे मंगळवेढ्याच्या ३५ गावच्या पाणी प्रश्नी  महाविकास आघाडी सरकारने राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी दोन टी.एम.सी. पाण्याची तरतूद करुन तालुक्याच्या दक्षिण भागातील जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नी सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल मंगळवेढ्यातील शिष्टमंडळाने खा.शरद पवार यांची भेट घेऊन कृतज्ञता व्यक्त करीत योजनेला गती देण्याची विनंती केली.

मंगळवेढा तालुक्यावर नेहमीच पालकत्वाच्या भूमिकेतून  नजर ठेवून असलेल्या महाविकास आघाडी सरकारचे शिल्पकार  खा.शरद पवार यांचे मंगळवेढा तालुक्यातील जनतेच्या वतीने त्यांचे ऋण व्यक्त केले. २०२१ च्या सुधारीत ताळेबंदात दोन टी.एम.सी.पाण्याची तरतूद नुकतीच करण्यात आली आहे . यावेळी पाणी संघर्ष समितीचे निमंत्रक पांडुरंग चौगुले यांनी संबंधित गावातील  सर्वेक्षण पूर्ण झाले असून सदरच्या योजनेस फेरमंजुरी , आर्थिक तरतूद करावी अशी मागणी  केली , तर राष्ट्रवादीचे नेते भारत बेदरे यांनी  सदर योजनेचे उदगाते स्व.भारतनाना भालके यांचे नाव सदर योजनेस  देण्यासंबंधी 5 सप्टेंबर रोजी  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंगळवेढा येथील बैठकीत करण्यात आलेल्या ठरावाची माहिती पवार साहेबांना देऊन ही योजना त्वरीत पुर्णत्वास जावी यासाठी लक्ष घालावे अशी मागणी  केली. या शिष्टमंडळात जि.प.सदस्य नितिन नकाते, न.पा.गटनेते अजित जगताप, नगरसेवक प्रविण खवतोडे, बशीर बागवान, राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष सुनिल डोके, छत्रपती परिवाराचे संस्थापक सुरेश पवार, राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष मुझम्मिल काझी, सोमनाथ बुरजे इ.प्रमुख पदधिकार, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मंगळवेढा शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेमध्ये कार्यरत पदाधिकारी व तालुक्यातील कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने फेरबदल करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली. पक्ष संघटनेमध्ये काही मंडळींनी कंपूगिरी चालवली असून त्यामुळे त्यामुळे अंतर्गत कलह व गटबाजी वाढीस लागल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आणून  दिल्याचे भारत बेदरे यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण