महागाई विरोधात अकलूजमध्ये राष्ट्रवादीचे आंदोलन६
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:15 IST2021-07-08T04:15:49+5:302021-07-08T04:15:49+5:30
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार महागाई विरोधात केंद्र सरकारच्या निषेधार्थ अकलूज येथील साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासमोर गॅस ...

महागाई विरोधात अकलूजमध्ये राष्ट्रवादीचे आंदोलन६
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार महागाई विरोधात केंद्र सरकारच्या निषेधार्थ अकलूज येथील साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासमोर गॅस टाकीला हार घालून आंदोलन केले. यावेळी राष्ट्रपती यांना उपविभागीय अधिकारी अकलूज यांच्यामार्फत निवेदन पाठविण्यात आले. सदर निवेदन मंडल अधिकारी चंद्रकांत भोसले यांनी स्वीकारले.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे, पं.स. सदस्य अजय सकट, उमाजी मिसाळ, लक्षवेधी सेनेचे अध्यक्ष अनिल साठे, उपाध्यक्ष अमित भिंगारदिवे, सन्मित्र संघाचे सुरेश गंभीरे, आकाश लोखंडे, दलित महासंघाचे संतोष खंडागळे, मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश शिंदे, प्रहार संघटनेचे अविनाश सोनवणे, साजिद सय्यद, मनसेचे सुदाम आवारे, पिंटू एकतपुरे, विकी केसकर, अभय भोसले, आनंद मिसाळ, उदय कांबळे, सचिन खिलारे, बंडू कांबळे, धवल कांबळे, विशाल गवळी, रफिक मुलाणी, राजू बागवान आदी संख्येने उपस्थित होते.