सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीच अव्वल !

By Admin | Updated: February 28, 2017 17:42 IST2017-02-28T17:42:39+5:302017-02-28T17:42:39+5:30

जि़प़ निवडणूक: तीन तालुक्यात भाजप आघाडीवर, ग्रामीण भागात भाजपची जोरदार मुसंडी

NCP is the top in Solapur district! | सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीच अव्वल !

सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीच अव्वल !

सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीच अव्वल !

सोलापूर: शिवाजी सुरवसे
सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीत झालेल्या मतदानाची आकडेवारी पाहता राष्ट्रवादीच जिल्ह्यात क्रमांक एकचा पक्ष राहिला राहिला आहे़ सहा तालुक्यात राष्ट्रवादी पुढे असून तीन तालुक्यात भाजपने क्रमांक एक ची मते मिळविली आहेत़ बार्शीमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपला जवळपास बरोबरीची मते मिळाली आहेत़ १३ लाख २४ हजार १२१ मतांपैकी ३ लाख ९३ हजार २४९ मते घड्याळाला तर ३ लाख २१ हजार ६९३ मते कमळाला पडली आहेत़ नगण्य असणाऱ्या भाजपने ग्रामीण भागात जोरदार मुसंडी मारली आहे़
माळशिरस, मोहोळ, बार्शी, माढा, करमाळा, उ़ सोलापूर या सहा तालुक्यात राष्ट्रवादीला क्रमांक एक ची तर अक्कलकोट, दक्षिण सोलापूर आणि पंढरपूर या तीन तालुक्यात भाजपला क्रमांक एक क्रमांकाची मते मिळाली आहे़माळशिरसमध्ये २ लाख ३० हजार ९२१ मतदान झाले त्यापैकी तब्बल १ लाख ११ हजार ७२७ मते घड्याळाला पडली आहेत़ इतर तालुक्यांच्या तुलनेत माळशिरसमध्ये सर्वाधिक मते राष्ट्रवादीने खेचून घेतली आहेत़ या तालुक्यात भाजपला ७६ हजार ५१७ मते मिळाली आहेत व काँग्रेसला अवघ्या ९ हजार ५७२ मतांवर समाधान मानावे लागले़ या ठिकाणी सेनेला १७ हजार मते मिळाली आहेत़
मोहोळ तालुक्यात १ लाख २५ हजार ९३९ मतदारांनी मतदानांचा हक्क बजाविली़ त्यापैकी ६४ हजार ८८० मते घड्याळा तर अवघी ३३६७ मते कमळाला मिळाली आहेत़ भीमा आघाडीने १४ हजार ५३६ मते मिळलिी आहेत़ उ़ सोलापूर मध्ये ४७ हजार ६८९ पैकी एकाच जागेवर राष्ट्रवादीने १२ हजार १६३ मते मिळवून क्रमांक एक वर शिक्कमोर्तब केला आहे मात्र या ठिकाणी भाजपने राष्ट्रवादीशी आघाडी केली होती़ या तालुक्यात काँग्रेसला १० हजार ५७० मते मिळाली आहेत़ बार्शी तालुक्यात १ लाख ४१ हजार ६७ मतांपैकी राष्ट्रवादीला ६६ हजार ४९३ तर भाजपला ६६ हजार ३६२ मते मिळाली आहेत़ राष्ट्रवादीला भाजपपेक्षा अवघी ३१ मते अधिक मिळाली आहेत़ करमाळ्यात १ लाख १८ हजार ५५२ मतांपैकी राष्ट्रवादीला ४५ हजार ९५४ तर सेनेला ४४ हजार ३५६ एवढी मते मिळाली आहेत़ माढ्यात १ लाख ५२ हजार मतांपैकी राष्ट्रवादीला ५५ हजार ९५४ तर सेनेला ४४ हजार ३५६ एवढी मते मिळाली आहेत़ या ठिकाणी भाजपचे उमेदवार नव्हते तर काँग्रेसला या तालुक्यात नोटा पेक्षा देखील कमी मते मिळाली आहेत़ इथे नोटाला १५७१ तर काँग्रेसला १०६५ मते मिळाली आहेत़
दक्षिण सोलापुरात १ लाख ८ हजार मतांपैकी ४१ हजार २१ मते मिळाल्यामुळे तालुक्यात भाजप क्रमांक एकचा पक्ष राहिला आहे़ या ठिकाणी काँग्रेसला ३९ हजार ९६५, सेनेला १२ हजार ४४० तर काँग्रेसला अवघी ७२६४ मते मिळाली आहेत़ अक्कलकोट तालुक्यात १ लाख ३१ हजार ७४ मतांपैकी भाजपने ५८ हजार ४६५ अशी क्रमांक एक ची तर काँग्रेसने ५४ हजार ९२९ एवढी दुसऱ्या क्रमांकची मते मिळविली आहेत़ या ठिकाणी राष्ट्रवादीला (१९९३) नोटा (२२३८) पेक्षा कमी मते मिळाली आहेत़ पंढरपुरात १ लाख ५२ हजार ५२१ मतांपैकी भाजपने ४५ हजार ८७४ मते घेऊन तालुक्यावर भाजपचा झेंडा लावला़ या तालुक्यात काँग्रेसला २० हजार २४२ तर घड्याळाला १९ हजार ९५९ एवढी मते मिळाली आहेत़ इन्फो
जि़प़ मध्ये एकही सदस्य नसलेल्या भाजपचे आता १४ सदस्य निवडूण आले आहेत़ ११ पंचायत समित्यांच्या १३६ जागांमध्ये देखील भाजपने ७७ जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष म्हणून पंचायत समितीवर स्थान मिळविले आहे़ भाजप ७७, काँग्रेस १७, राष्ट्रवादी ४४, शिवसेना ९, स्थानिक आघाड्या २१, अपक्ष १२ असे पंचायत समितीमधील बलाबल आहे़

.......
इन्फो बॉक्स़़़
जि़प़ पक्षनिहाय व आघाडीनिहाय मिळालेल्या जागा
करमाळा ५जागा- शिवसेना ४, राष्ट्रवादी १,
माढा ७ जागा-राष्ट्रवादी ५, आघाडी १, अपक्ष १
बार्शी ६ जागा-भाजप ३, राष्ट्रवादी ३
उ़सोलापूर २-राष्ट्रवादी १, काँग्रेस १
मोहोळ ६ जागा- राष्ट्रवादी ३, आघाडी ३
पंढरपूर ८ जागा- भाजप ४, राष्ट्रवादी १, आघाडी ३
सांगोला ७ जागा- आघाडी २, अपक्ष ५
मंगळवेढा ४ जागा- काँगे्रस १, आघाडी ३
द़ सोलापूर ६ जागा- भाजप २, काँग्रेस २, राष्ट्रवादी १, सेना १
अक्कलकोट ६ जागा- भाजप २, काँग्रेस ३, अपक्ष १
माळशिरस ११ जागा- भाजप ३, राष्ट्रवादी ८
......
चौकट़़़़
१३ लाख पैकी ३़२१ लाख मते भाजपला
२१ लाख ४६ हजार मतदारांपैकी १३ लाख २४ हजार १२१ मतदारांनी मतांचा अधिकार बजाविला़ यामध्ये राष्ट्रवादीला ३ लाख ९३ हजार २४९ मते (३० टक्के), भाजपला ३ लाख २१ हजार ६९३ (२४ टक्के), काँग्रेसला १ लाख ६५ हजार मते (१२ टक्के) तर सेनेला १ लाख २५ हजार मते (९ टक्के) मते मिळाली आहेत़ १७ हजार ७४४ जणांनी ह्यनोटाह्ण ला आपली पसंती दिली आहे़ मंगळवेढा आणि पंढरपूर मध्ये स्थानिक आघाड्यांना जास्त मते मिळाली आहेत़

Web Title: NCP is the top in Solapur district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.