निवडणुकीसाठी वैरागमध्ये राष्ट्रवादीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:23 IST2021-07-28T04:23:28+5:302021-07-28T04:23:28+5:30

वैराग : बार्शी तालुक्यतील नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीसाठी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने बार्शी तालुकास्तरीय विचारविनिमय व आढावा बैठक ...

NCP meeting in Vairag for elections | निवडणुकीसाठी वैरागमध्ये राष्ट्रवादीची बैठक

निवडणुकीसाठी वैरागमध्ये राष्ट्रवादीची बैठक

वैराग : बार्शी तालुक्यतील नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीसाठी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने बार्शी तालुकास्तरीय विचारविनिमय व आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीचे आयोजन निरंजन भूमकर व महिला अध्यक्षा सुप्रिया गुंड यांच्या उपस्थित झालझे. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष बळीराम साठे होते, तर प्रमुख पाहुणे बार्शी तालुका निरीक्षक गजानन खमितकर होते.

यावेळी तालुक्यातील पक्ष कार्याचा आढावा घेऊन बार्शी नगरपालिका व वैराग नगरपंचायतीच्या येऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाच्या कामगिरीबाबतचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, वैराग शहराध्यक्ष प्रशांत भालशंकर, बार्शी तालुका महिला आघाडीच्या प्रमुख ॲड. सुप्रिया गुंड पाटील, शलाका पाटील, सुवर्णा शिवपुरे, मौलाना शेख, अमोल आंधळकर, अँड. विक्रम सावळे, राजकुमार पौळ, भारत देशमुख यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी जयंत देशमुख, शहानवाज शेख आदी उपस्थित होते.

---

Web Title: NCP meeting in Vairag for elections