शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय समित्यांवर राष्ट्रवादी 60 टक्के अन्‌ सेना-काँग्रेसला 20-20 टक्के वाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 12:03 IST

पालकमंत्र्यांची माहिती :  सेनेच्या शिष्टमंडळाने केली प्रत्येकी ३० टक्के मागणी

करमाळा : सोलापूर जिल्ह्यातील विविध शासकीय समित्यांवरील पदाधिकाऱ्यांच्या निवडीचा फॉर्म्युला ठरलेला असून, राष्ट्रवादी काँग्रेस ६० टक्के तर शिवसेनाकाँग्रेस प्रत्येकी २० टक्के पदांवर निवडी करण्याचे ठरले असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. दरम्यान, सेनेच्या शिष्टमंडळाने सेना व काँग्रेस ३०-३० टक्केची मागणी करण्यात आली.

करमाळा तालुक्याच्या सीमेवरील मदनवाडी ग्रामपंचायतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पालकमंत्री आले होते. येथे शिवसेनेच्या वतीने उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी राज्यात आघाडी सरकार स्थापन होऊन दीड वर्षाहून अधिक कालावधी झालेला असताना राज्यातील बोर्ड, महामंडळ व विविध शासकीय समित्यांचे पदाधिकारी व सदस्य अद्याप निवडले गेले नाहीत. सोलापूर जिल्ह्यात निवडी करताना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाची पदे द्यावीत, अशी मागणी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना भेटून निवेदनाव्दारे केली. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. 

पालकमंत्री भरणे यांनी जिल्ह्यातील विविध शासकीय समित्यांमध्ये सरकारमध्ये असलेल्या तिन्ही  पक्षांतील कार्यकर्त्यांना स्थान देण्यात येणार आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस ६० टक्के तर शिवसेना व काँग्रेस पक्षाला २०-२० अशी ४० टक्के जागा देण्याचे ठरलेले आहे, असे सांगितले. यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी शिवसेना व काँग्रेसला प्रत्येकी ३० टक्के समित्यांवर संधी द्यावी, अशी मागणी केली. 

दीपक साळुंके समन्वय समितीचे प्रमुख सोलापूर जिल्ह्यातील विविध शासकीय समित्यांवरील कार्यकर्त्यांच्या निवडीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस या तिन्ही पक्षांकडून याद्या घेण्याची जबाबदारी समन्वय समिती प्रमुख म्हणून सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंके यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. 

- पालकमंत्र्यांनी सूचित केल्याप्रमाणे जर २० टक्के फॉर्म्युल्यानुसार तालुक्यात शिवसेना, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमधून कोणाची वर्णी लागेल यावरही आता चर्चा झडू लागल्या आहेत. दरम्यान २० टक्क्यांऐवजी ३० टक्के वाटा मिळावा या सेनेच्या मागणीला राष्ट्रवादी कितपत प्रतिसाद देणार याकडेही लक्ष वेधले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरPoliticsराजकारणcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना