सोलापूर महापालिकेसाठी राष्ट्रवादी ४५ जागांवर ठाम; काँग्रेस २५ च्या पुढे सरकेना !
By Admin | Updated: January 24, 2017 20:23 IST2017-01-24T20:23:01+5:302017-01-24T20:23:01+5:30
सोलापूर महापालिकेसाठी राष्ट्रवादी ४५ जागांवर ठाम; काँग्रेस २५ च्या पुढे सरकेना !

सोलापूर महापालिकेसाठी राष्ट्रवादी ४५ जागांवर ठाम; काँग्रेस २५ च्या पुढे सरकेना !
सोलापूर महापालिकेसाठी राष्ट्रवादी ४५ जागांवर ठाम; काँग्रेस २५ च्या पुढे सरकेना !
सोलापूर : आॅनलाईन लोकमत
’‘राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेसचे नेते तथा माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या आदेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाची आघाडी करण्याचे संकेत मिळाल्यानंतर आज (शनिवारी) दोन्ही काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केवळ प्राथमिक चर्चा करून बैठक आटोपती घेतली. आजच्या बैठकीत राष्ट्रवादीने ४५ जागांचा आग्रह धरला तर २५ च्या पुढे जागा देण्यास काँग्रेस तयार नाही. त्यामुळे आघाडी होईल की नाही ? ही संभ्रमावस्था दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.
माजी आ.दिलीप माने यांच्या बेलाटी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात आज दुपारी ही बैठक झाली. गेल्या निवडणुकीत दोन्ही काँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणुका लढविल्या होत्या. त्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी काँग्रेसला चांगले लक्ष्य केले होते. त्यावेळच्या निवडणकुीत काँग्रेसचे ४५ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे १६ नगरसेवक निवडून आले होते. मनपाची सत्ता हस्तगत करण्यासाठी मात्र दोन्ही काँग्रेसने आघाडी केली होती. आता पुढील महिन्यात होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी आघाडी करण्याचे संकेत राष्ट्रवादीचे शरद पवार आणि काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांनी दिले आहेत. आघाडी करण्याचा पूर्ण अधिकार स्थानिक नेतेमंडळींना दिले असून, शुक्रवारी सोलापुरात आल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यास दुजोरा दिला आहे. त्यानुसार आज (शनिवारी) माजी आमदार दिलीप माने यांच्या बेलाटी येथील महाविद्यालयाच्या सभागृहात दोन्ही काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली.
बैठकीस माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार प्रकाश यलगुलवार, नगरसेवक चेतन नरोटे तर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, उपमहापौर प्रवीण डोंगरे, महेश गादेकर, शंकर पाटील यांची उपस्थिती होती. कुठल्या प्रभागातून किती अर्ज आले आणि एकही अर्ज न आलेले कुठले प्रभाग आहेत, याविषयीचीच चर्चा रंगली.