शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली!
2
रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार
3
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
4
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
5
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
6
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
7
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
8
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
9
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
10
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
11
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
12
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
13
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
14
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
15
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
16
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
17
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
18
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
19
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती

बेताल वक्तव्य भोवले, भाजप आमदार राम कदमांविरुद्ध गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2018 4:02 PM

भाजप आमदार राम कदम यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी पोलीस स्थानकात हा पहिला गुन्हा दाखल करण्यात आला.

सोलापूर - भाजप आमदार राम कदम यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी पोलीस स्थानकात हा पहिला गुन्हा दाखल करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या मंदाकिनी काळे यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. राम कदम यांनी घाटकोप येथील दहीहंडी कार्यक्रमात बोलताना मुली पळवून आणू, असे वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राज्यभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली असून तीव्र शब्दात त्यांचा निषेध करण्यात येत आहे. 

भाजप आमदार राम कदम यांच्याविरुद्ध बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यापूर्वी सांगली येथे त्यांच्याविरुद्ध विनयभंगाची तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, महाराष्ट्रात दाखल झालेला हा पहिलाच गुन्हा असल्याचे समजते. आयपीसीच्या कलम 504, 505 अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राम कदम यांनी दहीहंडी कार्यक्रमात प्रक्षोभक भाषण करत महिलांचा अपमान केला. तसेच समाजातील महिलांची शांतता भंग होईल, असे कृत्य केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. बार्शी तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या नेत्या मंदाकिनी काळे यांनी याबाबत फिर्याद दिली. तसेच बार्शी शहरात आज राम कदम यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पोलिसांनी आंदोलकांचे हे कृत्य थांबवले. बार्शीकरांनी एकत्र येत जुन्या गांधी पुतळ्याजवळ राम कदमच्या पुतळ्याला मिरवत निषेध नोंदविला. यावेळी मंदाताई काळे, अॅड राजश्री डमरे,  माजी नगरसेविका शेळवणे, नगरपालिका विपक्ष पक्षनेते नागेश अक्कलकोटे, भूमाता ब्रिगेडचे विक्रांत पवार, मनसेचे विक्रम पवार, करुणा हिगंमिरे रिजवाना शेख प्रविण थळकरी जेष्ठ पञकार आप्पा पवार यांसह इतर बार्शीकरांनी राम कदम यांचा तीव्र निषेध नोंदवला.

 

टॅग्स :Ram Kadamराम कदमSolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी