मयताच्या वारसास नैसर्गिक आपत्ती निधीचा धनादेश सुपूर्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:22 IST2021-09-03T04:22:46+5:302021-09-03T04:22:46+5:30
तिप्पेहाळी येथील विठ्ठल ज्ञानू नरळे (वय ४०) यांच्या अंगावर २६ जून रोजी सायंकाळी ४ च्या सुमारास घरापाठीमागे वीज पडल्याने ...

मयताच्या वारसास नैसर्गिक आपत्ती निधीचा धनादेश सुपूर्द
तिप्पेहाळी येथील विठ्ठल ज्ञानू नरळे (वय ४०) यांच्या अंगावर २६ जून रोजी सायंकाळी ४ च्या सुमारास घरापाठीमागे वीज पडल्याने मृत्यू झाला होता. तलाठ्यांनी पंचनामा करून त्यांच्या वारसांना मदत मिळावी म्हणून तहसील कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यांच्या वारस पत्नी कांताबाई नरळे यांना नैसर्गिक आपत्तीतून प्राप्त झालेला ४ लाख रुपये शासकीय मदत निधीचा धनादेश आमदार शहाजी बापू पाटील यांच्या हस्ते सुपूर्द केला.
यावेळी तहसीलदार अभिजित पाटील, निवासी नायब तहसीलदार किशोर बडवे, महसूल नायब तहसीलदार शुभांगी अभंगराव, महसूल अव्वल कारकून समीर मुजावर, माजी नगराध्यक्ष रफिक नदाफ, स्वीय सहायक दत्ता गायकवाड तहसील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
फोटो ओळ : कांताबाई नरळे यांना आपत्ती निधीचा धनादेश सुपूर्द करताना आ. शहाजीबापू पाटील, तहसीलदार अभिजित पाटील, किशोर बडवे, शुभांगी अभंगराव आदी.