कुर्डूवाडीत नरहरी महाराज पुण्यतिथी साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:41 IST2021-03-04T04:41:38+5:302021-03-04T04:41:38+5:30

: येथील श्री संत नरहरी सोनार बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने त्यांचा पुण्यतिथी सोहळा कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर साधेपणाने व भक्तीमय ...

Narhari Maharaj Punyatithi celebration at Kurduwadi | कुर्डूवाडीत नरहरी महाराज पुण्यतिथी साजरी

कुर्डूवाडीत नरहरी महाराज पुण्यतिथी साजरी

: येथील श्री संत नरहरी सोनार बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने त्यांचा पुण्यतिथी सोहळा कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर साधेपणाने व भक्तीमय वातावरणात साजरा केला.

प्रारंभी श्री विठ्ठल-रुक्मिणी व श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या प्रतिमेस शैलेश वेदपाठक - कीर्ती वेदपाठक व मयुर शहाणे - वैष्णवी शहाणे या दाम्पत्यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. यानंतर कीर्तन सेवा झाली. श्रींच्या प्रतिमेवर गुलाल व पुष्पवृष्टी करुन संस्थेचे अध्यक्ष संदीप दीक्षित - प्रियंका दीक्षित या दाम्पत्यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी रमाकांत पारखे, उमाकांत पारखे, पंडित टाकसाळे, अरुण महामुनी, ज्ञानेश्वर दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष सुनील टाकसाळे, खजिनदार धनंजय महामुनी, सहसेक्रेटरी मदन पोतदार, सभासद संतोष दीक्षित, मनोजकुमार शहाणे, अनुराग दीक्षित, रामचंद्र दीक्षित आदींनी परिश्रम घेतले.

फोटो

०३कुर्डूवाडी०१

ओळी

कुर्डूवाडी येथील विठ्ठल मंदिरात श्री संत शिरोमणी नरहरी महाराज पुण्यतिथी साजरी करताना अरुण महामुनी, पंडित टाकसाळे, शंकर वेदपाटक, उमाकांत पारखे, संदीप दीक्षित, संतोष दीक्षित, धनंजय महामुनी आदी.

Web Title: Narhari Maharaj Punyatithi celebration at Kurduwadi