शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदी बुधवारी सोलापूर दौºयावर, दिल्लीच्या विशेष पथकाकडून सभा स्थळाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 10:39 IST

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ९ जानेवारी रोजी होणाºया सोलापूर दौºयाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली स्पेशल सिक्युरिटी (एसपीजी)कडून पार्क स्टेडियमच्या ...

ठळक मुद्दे नरेंद्र मोदी सोलापूर दौºयात विविध विकास कामांचा करणारे शुभारंभदिल्ली स्पेशल सिक्युरिटी (एसपीजी)कडून पार्क स्टेडियमच्या मैदानाची पाहणीपोलीस आयुक्त महादेव तांबडे यांना दौºयादरम्यानचा पोलीस बंदोबस्त कसा असला पाहिजे याच्या सूचना दिल्या

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ९ जानेवारी रोजी होणाºया सोलापूर दौºयाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली स्पेशल सिक्युरिटी (एसपीजी)कडून पार्क स्टेडियमच्या मैदानाची पाहणी करण्यात आली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौºयाला अवघे दोन दिवस राहिले आहेत. या दौºयाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन, महानगरपालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. इंदिरा गांधी पार्क स्टेडियम ही जागा निश्चित झाल्याने सध्या रंगरंगोटी प्रवेशद्वारी आदींची सजावट केली जात आहे. रविवारी दिल्ली स्पेशल सिक्युरिटी (एसपीजी) चे पथक सोलापुरात दाखल झाले होते. या पथकाने पार्क स्टेडियमची बारीक पाहणी केली. नरेंद्र मोदी यांच्या सभेचा स्टेज कोठे असला पाहिजे, त्यांचा प्रवेश कसा होईल, त्यांच्यासाठी आवश्यक असलेली सुरक्षा व्यवस्था कशी असेल याची माहिती दिली. 

पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांना दौºयादरम्यानचा पोलीस बंदोबस्त कसा असला पाहिजे याच्या सूचना दिल्या. महापालिका आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांना स्टेडियमबाबत कोणती काळजी घ्यावी लागेल ते सांगितले. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोणत्या जबाबदाºया पार पाडाव्या लागणार आहेत याची माहिती दिली. विविध सूचना करून त्याप्रमाणे नियोजन करावे, असेही एसपीजी पथकातील अधिकाºयांनी यावेळी सांगितले. 

मार्गाची केली पाहणी...च् दिल्ली स्पेशल सिक्युरिटी (एसपीजी) च्या पथकांनी विमानतळ ते इंदिरा गांधी पार्क स्टेडियम या मार्गाची पाहणी केली. पार्क स्टेडियम ते सरस्वती चौक, रेल्वे स्टेशन या मार्गाचीही पाहणी केली. मार्गातील अडथळे, वाहतूक व्यवस्था आदी बाबींवर चर्चा करून आवश्यक त्या सूचना केल्या. एसपीजीचा एक कॅनव्हा या रस्त्यावरून फिरत होता. सर्व मार्गावर सुरक्षेच्या दृष्टीने कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सर्व बारीक हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरNarendra Modiनरेंद्र मोदीPoliceपोलिसdelhiदिल्ली