नारायण पाटील यांनी बदलली समीकरणे

By Admin | Updated: October 21, 2014 13:56 IST2014-10-21T13:56:29+5:302014-10-21T13:56:29+5:30

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर करमाळ्याचे राजकीय समीकरण बदलले असून, आता तालुक्याच्या राजकारणात बागल, जगताप, पाटील याशिवाय चौथा गट म्हणून संजय शिंदे गट सक्रिय झाला आहे.

Narayan Patil changed the equations | नारायण पाटील यांनी बदलली समीकरणे

नारायण पाटील यांनी बदलली समीकरणे

नासीर कबीर■ करमाळा

 
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर करमाळ्याचे राजकीय समीकरण बदलले असून, आता तालुक्याच्या राजकारणात बागल, जगताप, पाटील याशिवाय चौथा गट म्हणून संजय शिंदे गट सक्रिय झाला आहे.
करमाळा विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवायची म्हणून केवळ दोन महिनेच मतदारसंघाची ओळख करून घेणारे संजय शिंदे यांनी चांगलीच लढत दिली. करमाळा तालुक्यात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने संजय शिदे यांनी चौथा पर्याय उभा केला आहे. तालुक्यातील बागल गटातील विलासराव घुमरे, वामन बदे, तात्यासाहेब मस्कर, सुभाष गुळवे, बागल यांच्या मांगी गावातील देवानंद बागल, सुजित बागल, जगताप गटाबरोबर असलेला सावंत गट आदींसह रथी-महारथी नेतेमंडळी आपल्याकडे वळविण्यात ते यशस्वी झाले आणि त्याकडे बागल यांनीही दुर्लक्ष केले. 
संजय शिंदे यांनी करमाळ्यातून अपेक्षेप्रमाणे २0 हजार मतांचा आकडा पार केला. त्याबरोबरच कुडरूवाडी भागातून ३८ हजारांपर्यंत मतदान घेतल्याने बागल यांची हक्काची मते संजय शिंदे यांच्या पारड्यात पडली. मतविभागणीचा सर्वाधिक फटका बागल यांनाच बसला व बागल यांच्या नशिबी अवघ्या २५७ मतांनी पराभव आला. 
नारायण पाटील यांनी ऐन लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना शिवसेनेत प्रवेश करून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची प्रचंड सभा घेऊन मोठे शक्तिप्रदर्शन करून वातावरण निर्मिती केली. शिवसैनिकांना बरोबर घेत मोहिते-पाटील यांचा अशीर्वाद घेऊन तालुक्यातील मोहिते-पाटील गटाच्या नेत्या सवितादेवी राजेभोसले, केमचे सरपंच अजित तळेकर, नागरिक संघटनेचे अध्यक्ष कन्हैय्यालाल देवी आदींचा पाठिंबा मिळवून प्रचाराचे रान पेटविले. धनगर समाजाचे एकगठ्ठा मतदान मिळवण्यात ते यावेळी यशस्वी झाले. काँग्रेसचे उमेदवार जयवंतराव जगताप यांच्या मतांचा टक्का वाढला नाही, त्यामुळे नारायण पाटील यांची मते घटली नाहीत. कुडरूवाडी भागातील शिवसैनिकांची प्रामाणिक साथ, पोस्टल मतात मिळालेली नशिबाची साथ यामुळे पाटलांचा विजयाचा मार्ग सुकर झाला.
काँग्रेसचे जयवंतराव जगताप निवडणुका जाहीर झाल्यावर रिंगणात उतरले तोपर्यंत त्यांच्या गटाचे सर्मथक दुसरीकडे प्रचाराला लागले होते गत विधानसभेपेक्षा या विधानसभा निवडणुकीत त्यांचे मताधिक्य वाढण्याऐवजी घटले. सरलेल्या विधानसभा निवडणुकीचे एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे पहिल्या फेरीपासून ते थेट अखेरच्या एकविसाव्या फेरीपर्यंत आघाडी घेणार्‍या रश्मी बागल यांना टपाली मताने दगा दिला. 
शसंजय शिंदे यांनीही दोन महिन्यांच्या त्यांच्या राजकीय कालावधीत प्रस्थापितांविरूध्द तालुक्याच्या राजकारणात वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. 
मतविभागणीचा फायदा 
■ माढा तालुक्याचे नेते संजय शिंदे यांनी करमाळा विधानसभा मतदारसंघात एंट्री केल्याने बागल गटाच्या सत्तास्थानाला हादरा बसला असून, मतविभाजनाचा व जातीच्या समीकरणाचा फायदा शिवसेनेचे नारायण पाटील यांना विजय मिळवून देण्यात झाला आहे.

Web Title: Narayan Patil changed the equations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.