भावजयीच्या आईचा खून करणाऱ्या नणंदेस पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:47 IST2021-02-05T06:47:19+5:302021-02-05T06:47:19+5:30
शनिवार, दिनांक ३० जानेवारी रोजी इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी येथील लक्ष्मी पवार (वय ४०) ही महिला आपल्या विधवा मुलीला भेटण्यासाठी ...

भावजयीच्या आईचा खून करणाऱ्या नणंदेस पोलीस कोठडी
शनिवार, दिनांक ३० जानेवारी रोजी इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी येथील लक्ष्मी पवार (वय ४०) ही महिला आपल्या विधवा मुलीला भेटण्यासाठी नातेवाईकांसह माढा तालुक्यातील दगड अकोले येथी गेली होती. यावेळी कीर्ती काळे, अल्पवयीन मुलीने लक्ष्मी पवारला एकटीला मुलीची भेट घालून देतो म्हणून घराकडे बोलावले. यानंतर उसाच्या शेतात नेवून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी जवळच असलेल्या कॅनाल जवळील विहिरीत मृतदेह टाकून दिला होता.
----फरार रॉकीचा शोध सुरू---
रविवारी ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलीस चौकशीत कीर्ती काळे, रॉकी आणि अल्पवयीन मुलीने हे कृत्य केल्याची माहिती समोर आली. सोमवारी टेंभुर्णी पोलिसांनी कीर्ती काळेला अटक करून माढा न्यायालयासमोर हजर केले. तिला सहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे, तर दुसरी मुलगी अल्पवयीन असल्याने तिला मंगळवारी बाल न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. या कृत्यास मदत करणारा रॉकी नामक व्यक्ती मात्र फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत.