मंद्रुपमध्ये माझं गाव कोरोनामुक्त.. जनजागरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:44 IST2021-02-05T06:44:59+5:302021-02-05T06:44:59+5:30

या प्रभातफेरीत जिल्हा परिषदेच्या चार शाळा, लोकसेवा व महात्मा फुले विद्यालय, कन्या प्रशाला, उर्दू माध्यमिक शाळांनी सहभाग नोंदवला. १८ ...

My village in Mandrup is free from corona .. Janajagaran | मंद्रुपमध्ये माझं गाव कोरोनामुक्त.. जनजागरण

मंद्रुपमध्ये माझं गाव कोरोनामुक्त.. जनजागरण

या प्रभातफेरीत जिल्हा परिषदेच्या चार शाळा, लोकसेवा व महात्मा फुले विद्यालय, कन्या प्रशाला, उर्दू माध्यमिक शाळांनी सहभाग नोंदवला.

१८ वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांना मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करून लोकशाहीला बळकट करा असे आवाहन या प्रभातफेरीमार्फत करण्यात आले. ‘माझे गाव कोराेनामुक्त गाव’ जनजागृतीसाठी जिल्हा परिषद सदस्या विद्युलता कोरे, पंचायत समिती सदस्या शालन चव्हाण, माजी सभापती गुरुसिद्ध म्हेत्रे, ग्रामविकास अधिकारी एस. आर. ठक्का, आरोग्याधिकारी डॉ. गायकवाड, जि. प. केंद्रप्रमुख बाबुराव कोळी, मुख्याध्यापक शिवाजी जाधव, पार्वती जाधव, जहाँआरा तांबोळी, मुख्याध्यापक श्रीधर टेळे यांच्या महात्मा फुले शाळेचे प्रतिनिधी यांच्यासह अन्य शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशावर्कर, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

प्रभातफेरीमध्ये गावातील विविध ठिकाणी मळसिद्ध मुगळे, गौरीशंकर मेंडगुदले व चिदानंद घाले यांनी शिक्षक, आरोग्य अधिकाऱ्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले.

----

Web Title: My village in Mandrup is free from corona .. Janajagaran