शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मुस्लीम बांधवांनी पावसासाठी केली नमाज अदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 12:45 IST

अहले हदिस मैदानावर आयोजन; शेकडोंची उपस्थिती; मौलाना बेग यांनी केले मार्गदर्शन; जून संपत आला तरी दुष्काळाचा दाह कायमच

ठळक मुद्देअल्लाहवर आमचा विश्वास असून, यंदा पाऊस चांगला पडेल, असा आशावाद मौलाना ताहिर बेग अल मोहमदी यांनी व्यक्त केलापाऊस पडला तर पाणी येईल, शेती चांगली पिकेल. शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कमी होईलशेतीवर अवलंबून असणाºया मजुरांना काम मिळेल, देशात संपन्नता येईल. महत्त्वाचे म्हणजे सोलापूरकरांना पावसामुळे दिलासा मिळेल

सोलापूर : जून महिना संपत आला तरीसुद्धा पावसाने पाठ फिरवली आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत. जिल्ह्यात दुष्काळ दाह वाढत आहे. यावर उपाय फक्त पावसाचाच आहे. यामुळे रंगभवन परिसरातील अहले हदिस ईदगाह मैदानावर मुस्लीम बांधवांनी पावसासाठी सामूहिक नमाज अदा केली.

मौलाना ताहिर बेग अल मोहमदी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, जगात पाप वाढले असून, माणसे अल्लाहपासून दूर जात आहेत. यामुळे पाऊस पडत नाही. अशा परिस्थितीत मोकळ्या मैदानावर अल्लाहकडे प्रार्थना करण्याची गरज होती. म्हणून सामूहिक नमाज अदा करण्यात आली. अल्लाहकडे लोकांकडून होणाºया चुकांची माफी मागण्यात आली.

पावसाच्या स्वरुपात आमच्यावर उपकार कर. आमच्या चुकांना माफ कर. अशी याचना मौलाना ताहिर बेग अल मोहमदी यांनी केली.देशभरात पावसाचे प्रमाण कमी आहे. यासाठी देशाच्या प्रत्येक शहरात पावसासाठी नमाज अदा करण्याचे आवाहन मौला ताहिर बेग अल मोहमदी यांनी केले. ते म्हणाले, सुन्नत जेव्हा जिवंत राहतील तेव्हाच देशाचा विकास होईल.

यासाठी मोहम्मद पैगंबरांनी सांगितलेल्या तत्वावर चालणे गरजेचे आहे. पाऊस पडला तर पाणी येईल, शेती चांगली पिकेल. शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कमी होईल. शेतीवर अवलंबून असणाºया मजुरांना काम मिळेल, देशात संपन्नता येईल. महत्त्वाचे म्हणजे सोलापूरकरांना पावसामुळे दिलासा मिळेल.

अल्लाहवर आमचा विश्वास असून, यंदा पाऊस चांगला पडेल, असा आशावाद मौलाना ताहिर बेग अल मोहमदी यांनी व्यक्त केला. यावेळी मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

जनावरांकडे पाहून तरी पाऊस पाड..- माणसे वाईट काम करतात म्हणून ते पापी आहेत. या सगळ्यात जनावरांचा काय दोष? म्हणून अल्लाहकडे दुवा मागताना मुस्लीम बांधवांनी घोडा आणला होता. या जनावराकडे पाहून अल्लाहने पाऊस पाडावा, अशी याचना अल्लाहकडे करण्यात आली. मुस्लीम बांधवांनी दुवा (याचना) पुश्त (हात उलटा करुन) पद्धतीने केली. ज्याप्रमाणे उलटा हात सरळ करणे सोपे आहे, त्याच पद्धतीने अल्लाहला पाऊस पाडणे सोपे आहे, म्हणून अल्लाहकडे याचना केली.

टॅग्स :SolapurसोलापूरRainपाऊसMuslimमुस्लीमNamajनमाजdroughtदुष्काळ