शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

नियम मोडत कासेगाव शिवारात मुरूम, खडीचे उत्खनन; शेतकºयांच्या बोअर, विहिरी आटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 12:43 IST

प्रभू पुजारी/मोहन डावरे  पंढरपूर : सांगोला-पंढरपूर या मार्गाचे दोन पदरीकरण व काँक्रिटीकरण सुरू आहे. ठेकेदाराने या रस्त्याच्या कामासाठी कासेगाव ...

ठळक मुद्देसांगोला-पंढरपूर या मार्गाचे दोन पदरीकरण व काँक्रिटीकरण सुरूनियम, अटी धाब्यावर बसवत नियमापेक्षा कित्येक पटीने जादा मुरुम, दगडाचे उत्खननधुळीमुळे उभी पिके उद्ध्वस्त होऊन कोट्यवधींचे नुकसान

प्रभू पुजारी/मोहन डावरे 

पंढरपूर : सांगोला-पंढरपूर या मार्गाचे दोन पदरीकरण व काँक्रिटीकरण सुरू आहे. ठेकेदाराने या रस्त्याच्या कामासाठी कासेगाव शिवारातील गट नं़ १५७, १५८ मधून मुरुम व खडीसाठी दगडाचे उत्खनन करण्याची परवानगी घेतली होती; मात्र त्यासाठी महसूल विभागाने घालून दिलेले सर्व नियम, अटी धाब्यावर बसवत नियमापेक्षा कित्येक पटीने जादा मुरुम, दगडाचे उत्खनन केले आहे. परिसरातील अनेक शेतकºयांच्या बोअर व विहिरी आटल्या आहेत़ तसेच धुळीमुळे उभी पिके उद्ध्वस्त होऊन कोट्यवधींचे नुकसान झाले़ शिवाय शासनाला कोट्यवधी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागले.

पंढरपूर-सांगोला मार्गाच्या रस्त्याचे काम आऱ के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला मिळाले आहे़ त्यामुळे या  रस्त्याला लागणारी खडी व मुरुमासाठी ठेकेदाराने कासेगाव शिवारातील गट नं़ १५७, १५८ मधून उत्खनन करण्याची परवानगी घेतली आहे, परंतु महसूल प्रशासनाने घालून दिलेले नियम या ठेकेदाराने पाळले नाहीत़ नियमबाह्य, बेकायदेशीर दगड व मुरुमाचे उत्खनन करत शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविला आहे. शिवाय परिसरातील शेतकºयांच्या बोअर, विहिरी आटल्या़ धुळीमुळे पिकांचे नुकसान झाले़ त्यामुळे या कंपनीच्या विरोधात परिसरातील शेतकरी, विविध संघटनांच्या तक्रारी महसूल प्रशासनाकडे आल्या़ त्यानंतरही महसूल विभागाने कारवाई करण्यास चालढकल केली.

नियमापेक्षा जास्त व खोल उत्खनन केल्यामुळे मोठमोठे खड्डे पडून जमिनीला पाणी लागले आहे़ या पाण्यामुळे परिसरातील अनेक शेतकºयांच्या विहिरी व बोअर यांची पाणीपातळी खालावली आहे तर काहींची पूर्णच बंद झाली आहे. पिके उद्ध्वस्त झाल्यानंतर महसूल प्रशासनाने कंपनीवर दंडात्मक  कारवाई करत शेतकºयांना नुकसानभरपाई देणे गरजेचे होते; मात्र महसूलकडून कागदी घोडे  नाचवत कारवाईचा फार्स सुरू आहे. त्यामुळे शेतकरी सामाजिक संघटना  आक्रमक होत उपोषणाच्या तयारीत आहेत. 

आऱ के. चव्हाण इन्फ्रास्ट्रक्चरचे साईराज पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन रिसिव्ह केला नाही़

रातोरात दोन खडी क्रशर हलविले- कासेगाव येथील शेतकºयांच्या तक्रारी, सामाजिक संघटनांनी उपोषणाचा इशारा दिल्याने प्रशासनावर कारवाईसाठी दबाव वाढला़ त्यानंतर कंपनीने दोन खडी क्रशर रातोरात गायब करण्यात यश मिळविले आहे; मात्र या ठिकाणी हजारो ब्रास खडी, दगड तसेच पडून आहेत, परंतु याठिकाणच्या सर्व भागाचे, अधिकाºयांच्या भेटी, पंचनामे याचे सर्व चित्रीकरण तक्रारदाराकडे आहे, त्यामुळे महसूल अधिकाºयांसह कंपनीची गोची झाली आहे. 

कासेगाव शिवारात बेकायदेशीर खडी उत्खनन झाल्याबाबतच्या तक्रारी आल्या आहेत. त्यानुसार कारवाई सुरू आहे, मात्र नक्की कारवाई काय झाली हे मला सांगता येणार नाही. तुम्ही गौण खनिजचे लिपिक मोमीन यांच्याशी संपर्क साधा ते अधिक माहिती देतील.- रामचंद्र शिंदे, अपर जिल्हाधिकारी

तक्रारीवरून या ठिकाणचे दगड, मुरुमाचे किती, कसे उत्खनन केले याची ईटीएस मशीनद्वारे मोजणी सुरू आहे़ त्याचा अहवाल आल्यानंतर कोणत्या स्वरूपात कारवाई करायची हे निश्चित होईल. - जे़ एम़ मोमीन, लिपिक, गौण खनिज विभाग पंढरपूर

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयroad transportरस्ते वाहतूकagricultureशेतीFarmerशेतकरी