खून करून प्रेत कॅनाॅलमध्ये टाकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:27 IST2021-09-12T04:27:05+5:302021-09-12T04:27:05+5:30
पोलीस सूत्रांनुसार शनिवारी सकाळी ८ वाजण्याच्या पूर्वी शेवरे येथील दिलीप मस्के यांच्या शेताजवळ उजनीच्या कॅनाॅलमधील पाण्यात एका अज्ञात व्यक्तीस ...

खून करून प्रेत कॅनाॅलमध्ये टाकले
पोलीस सूत्रांनुसार शनिवारी सकाळी ८ वाजण्याच्या पूर्वी शेवरे येथील दिलीप मस्के यांच्या शेताजवळ उजनीच्या कॅनाॅलमधील पाण्यात एका अज्ञात व्यक्तीस ठार मारून त्याचे प्रेत पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने दोन्ही हातपाय कपड्याने बांधून टाकले असल्याचे आढळले. सिद्धेश्वर गोरख मस्के (रा. शेवरे) यांनी फिर्याद दिली आहे. टेंभुर्णी पोलिसांनी भादंवि कलम ३०२, २०१ नुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदला आहे. तपास पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर करीत आहेत.
----
ठाण्याशी संपर्क साधा
मृत व्यक्ती साधारण ४५ वर्षाचा आहे. अंगात काळ्या रंगाची पॅन्ट व फिकट पिवळ्या रंगाचा शर्ट आहे. गळ्याला चॉकलेटी रंगाचा मफलर गुंडाळलेला आहे. या वर्णन असलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी टेंभुर्णी पोलीस स्टेशनमध्ये संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी केले आहे.