मोबाइल चोरल्याच्या संशयावरून अक्कलकोटमध्ये तरुणाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:10 IST2021-01-08T05:10:44+5:302021-01-08T05:10:44+5:30

याबाबत उत्तर पोलीस ठाण्यात धनंजय मडीखांबे आणि प्रिन्स उर्फ स्वामी शिवरण शिंदे (दोघे रा. भीमनगर, अक्कलकोट) यांच्याविरुद्ध फिर्याद दिल्याने ...

Murder of youth in Akkalkot on suspicion of mobile theft | मोबाइल चोरल्याच्या संशयावरून अक्कलकोटमध्ये तरुणाचा खून

मोबाइल चोरल्याच्या संशयावरून अक्कलकोटमध्ये तरुणाचा खून

याबाबत उत्तर पोलीस ठाण्यात धनंजय मडीखांबे आणि प्रिन्स उर्फ स्वामी शिवरण शिंदे (दोघे रा. भीमनगर, अक्कलकोट) यांच्याविरुद्ध फिर्याद दिल्याने गुन्हा नोंदला आहे.

पोलीस सूत्राकडील माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी धनंजयचा मोबाइल चोरीला गेला. याबाबत उज्ज्वलवर संशय होता. ४ जानेवारी रोजी रात्री ११ च्या सुमारास अक्कलकोट शहरातील अरबगल्लीजवळील रज्जीअल्ली दर्ग्याजवळ धनंजय आणि प्रिन्स या दोघांनी त्यास अडविले. त्याला गटारीत ढकलून देऊन त्याच्यावर दगड व शाबाद फरसी घालून गंभीर जखमी केले. या घटनेनंतर त्यास ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉकटरांनी मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर भीमनगर येथील स्मशानभूमीत त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

याबाबत पंचू पिरप्पा मडीखांबे यांनी अक्कलकोट येथील उत्तर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक के. एस. पुजारी करीत आहेत.

----

Web Title: Murder of youth in Akkalkot on suspicion of mobile theft