चाकूने सपासप वार करून तरूणाचा खून; नई जिंदगी परिसरातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 13:27 IST2020-06-12T13:24:16+5:302020-06-12T13:27:52+5:30
पोलिस घटनास्थळी दाखल; जागेच्या वादातून खून झाल्याची चर्चा

चाकूने सपासप वार करून तरूणाचा खून; नई जिंदगी परिसरातील घटना
सोलापूर : शहरातील नई जिंदगी परिसरात असलेल्या मोसीन पानपट्टीजवळ एका तरूणाचा खून झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. शकील पटेल असे मृत व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान, पोलीसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
दरम्यान, मृत शकील शेख हा जागा खरेदी विक्रीचा व्यवसाय करीत होता. जागेच्या वादातून गुरूवारी सायंकाळी दोघांमध्ये वादावादी झाली. त्या प्रकरणातूनच शुक्रवारी हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच सोलापूर शहर पोलिस दलातील एमआयडीसी पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाºयांनी घटनास्थळी भेट दिली़ या घटनेमुळे नई जिंदगी परिसरात आता पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.