घराबाहेर झोपलेल्या एकाचा डोक्यात दगड घालून केला खून; सरकोली येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 11:36 AM2020-05-22T11:36:26+5:302020-05-22T11:39:31+5:30

पंढरपूर पोलीसांचे पथक घटनास्थळी; डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू

Murder by throwing a stone at the head of a person sleeping outside the house; Incident at Sarkoli | घराबाहेर झोपलेल्या एकाचा डोक्यात दगड घालून केला खून; सरकोली येथील घटना

घराबाहेर झोपलेल्या एकाचा डोक्यात दगड घालून केला खून; सरकोली येथील घटना

Next
ठळक मुद्दे- या घटनेची माहिती मिळताच पंढरपूर पोलीसांचे पथक घटनास्थळी दाखल- मृत संतोष कपणे याचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रूग्णालयात दाखल- सरकोलीतील घटनेने पंढरपूर तालुक्यात खळबळ...

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे एकाची निर्घृण हत्या करण्यात आली. डोक्यात दगड घालून खून केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली़ ही घटना शुक्रवारी घडली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस प्रशासनाकडून लावण्यात येत आहे. मृत्यू झालेल्या इसमाचे नाव संतोष सुरेश कपणे असे आहे.

पंढरपूर तालुक्यातील सरकोली इसमाचा खून झाल्याची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे, पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी घटनास्थळी भेट दिली. संतोष सुरेश कपणे (वय ३१, रा. सरकोली, ता. पंढरपूर) हे घराच्या बाहेर झोपले असताना त्यांच्या डोक्यामध्ये अज्ञात इसमाने दगड मारला. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. 

 

Web Title: Murder by throwing a stone at the head of a person sleeping outside the house; Incident at Sarkoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.