Murder with stone in head; Events in the city of Pandharpur | डोक्यात दगड घालून केला खून; पंढरपूर शहरातील घटना
डोक्यात दगड घालून केला खून; पंढरपूर शहरातील घटना

ठळक मुद्दे- पंढरपूर शहरात अज्ञात व्यक्तीचा खून- घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल- खून झालेल्या व्यक्तीचे नाव व पत्ता समजले नाही

पंढरपूर : पंढरपूर शहरांमधील मध्यवर्ती ठिकाणी एका अज्ञात व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून खून झाल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी दहा वाजता उघड झाला आहे. 

पंढरपूर येथील स्टेशन रोडवरील तुती रेशीम उत्पादन कथा कोष खरेदी कक्ष तथा खादी ग्रामउद्योग त्याठिकाणी गुरुवारी मध्यरात्री अज्ञात व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला आहे. ही घटना पोलीस प्रशासनाला शुक्रवारी सकाळी दहा वाजता समजली़ त्यानंतर तत्काळ पोलिस अधिकाºयांनी घटनास्थळी भेट दिली. मात्र खून झालेल्या इसमाचे नाव व पत्ता पोलिसांना अद्याप कळलेले नाही. खून झाल्याची माहिती मिळताच पंढरपूर शहरातील नागरिकांनी खादी ग्रामोद्योग परिसरात गर्दी केली होती.

 

Web Title: Murder with stone in head; Events in the city of Pandharpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.