शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

महाळुंगमध्ये युवकाचा खून; तीन संशयित आरोपी ताब्यात

By काशिनाथ वाघमारे | Updated: February 3, 2024 19:08 IST

महाळुंग (ता. माळशिरस) येथील शिवाजी विठ्ठल चव्हाण (वय २२) या युवकाची गावातील स्मशानभूमीत निर्घृण खून झाला.

सोलापूर: महाळुंग (ता. माळशिरस) येथील शिवाजी विठ्ठल चव्हाण (वय २२) या युवकाची गावातील स्मशानभूमीत निर्घृण खून झाला. याप्रकरणी पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. ही घटना गुरुवार, १ फेब्रुवारीच्या मध्यरात्री घडली. शुक्रवारी सकाळ ग्रामस्थांना मृतदेह दिसला आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तीन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. मृत युवक शिवाजी चव्हाण हा अकलूज येथील साखर कारखान्यांमध्ये काम करत होता. तसेच तो हलगी वाजवण्याचेही काम करायचा. रात्री कार्यक्रमामधून हलगी वाजून शिवाजी घरी आला होता. त्यानंतर स्मशानभूमीमध्ये मृतदेह आढळला. त्याच्या पश्चात आई, पत्नी, लहान मुलगी असा परिवार आहे.

पंढरपूरचे डीवायएसपी अर्जुन भोसले, अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चौधरी, पीएसआय साळुंखे, पीएसआय महाडिक, एएसआय बाळासाहेब पानसरे, पोलीस कॉ. संजय चंदनशिवे, किशोर गायकवाड, यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलीस बंदोबस्त चोख ठेवून, पंचनामा केला आहे, डीवायएसपी अर्जुन भोसले यांनी पुढील तपासासाठी पोलिसांना सूचना देऊन, वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांची पथके पाठवली आहेत. महाळुंग गावातीलच काही संशयतांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. महाळुंगमध्ये पोलिस बंदोबस्तघटनेची माहिती मिळताच गावातील बघ्यांनी स्मशालभूमीत गर्दी केली होती. अकलूज पोलीस स्टेशनने महाळुंग गावामध्ये पोलीस बंदोबस्त चोख ठेवला आहे. सकाळी अकलूज पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. फॉरेन्सिक लॅबसाठी नमुने देखील घेतले आहेत, श्वान पथकाला देखील बोलवण्यात आले आहे, घटनास्थळी दुचाकी गाडी, मोबाईल, दोन धारदार लोखंडी तीक्ष्ण हत्यारे, दिसून येत आहेत. शव विच्छेदनासाठी मृतदेह अकलूज उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरDeathमृत्यू