शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

अपहरण झालेल्या त्या मुलाची हत्या, मृतदेह ताब्यास घेण्यास नातेवाईकांचा नकार, माचणूर येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 16:44 IST

मंगळवेढा : माचणूर येथून अपहरण झालेल्या प्रतीक शिवशरण या नऊ वर्षाच्या मुलाची निर्घुण हत्या झाल्याचे गुरुवारी दुपारी उघडकीस आले ...

ठळक मुद्देप्रतीक चा शोध घेण्याचा कसून प्रयत्न केला मात्र कोणताही सुगावा हाती लागत नव्हता गुरुवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आला असून घातपात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे

मंगळवेढा : माचणूर येथून अपहरण झालेल्या प्रतीक शिवशरण या नऊ वर्षाच्या मुलाची निर्घुण हत्या झाल्याचे गुरुवारी दुपारी उघडकीस आले असून त्याचा मृतदेह गावालगत असणाºया महादेव डोके यांच्या उसाच्या शेतात शेळ्या राखणाºया एका महिलेला आढळून आला या बालकाची निर्घृण हत्या करण्यात आली असून कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे़  त्याच्या मारेकºयांना जो पर्यत ताब्यात घेणार नाही  तोपर्यत अंत्यसंस्कार करणार नाही असा पवित्रा घेतला आहे.

 गेल्या पाच दिवसांपासून पोलिसांनी जंगजंग पछाडत त्या अपहरण झालेल्या प्रतीक चा शोध घेण्याचा कसून प्रयत्न केला मात्र कोणताही सुगावा हाती लागत नव्हता गुरुवारी दुपारी हा प्रकार उघडकीस आला असून घातपात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे प्रतिक च्या शरीरावर जखमा आहेत.

दरम्यान ही घटना उघडकीस आल्यामुळे तालुकाभर खळबळ माजली आहे दरम्यान मयत कुटुंबीयांनी प्रयत्नात घेण्यास नकार दिला असून पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे प्रतीक चा बळी गेल्याची भावना संतप्त कुटुंबियाकडून व्यक्त होत आहे आरोपींचा शोध घेऊन अटक केल्याशिवाय प्रेत ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला आहे.

दरम्यान ही घटना समजल्यापासून माचनूर व परिसरात शोककळा पसरली  होती़ माचणूर येथील प्रतीक मधुकर शिवशरण  या नऊ वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याची घटना पाच दिवसांपूर्वी घडली होती.  शनिवारी तो सकाळी शाळा असल्याने शाळा संपल्यानंतर घरी आला नंतर सायंकाळी पाचच्या सुमारास बाहेर खेळण्यासाठी गेला तो घरी आला नाही    म्हणून अज्ञात इसमा विरोधात भादवि कलम 363 नुसार गुन्हा दाखल केला होता

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसCrime Newsगुन्हेगारीMurderखून