शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत देश सर्वार्थाने सामर्थ्यशाली करा, आपल्या इतिहासाचा प्रतिशोध घ्यायचा आहे”: अजित डोवाल
2
BMC Election 2026: ...तर १६ तारखेनंतर 'जय श्रीराम' म्हणता येणार नाही; नितेश राणेंचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल!
3
"उगाच अभिषेकचं नाव कशाला घेता?"; तेजस्वी घोसाळकरांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
4
११ लाखांची पैज! संजय राऊतांचे CM फडणवीसांना ओपन चॅलेंज; म्हणाले, “हिंमत दाखवा अन्...”
5
महिलांना आत्मनिर्भर करणारी योजना! ४,४५० रुपयांच्या योजनेवर मिळवा १६ लाखांचा निधी
6
IND vs NZ 1st ODI Live Streaming : रोहित-विराट पुन्हा मैदानात उतरणार; कोण ठरणार सगळ्यात भारी?
7
“काँग्रेसच्या १५ वर्षांच्या राजवटीत भोगावा लागलेला वनवास दूर करत परिवर्तन घडवा”: एकनाथ शिंदे
8
चक्क साडी नेसून मैदानात उतरल्या महिला; फुटबॉल सामन्याचा व्हिडिओ इंटरनेटवर घालतोय धुमाकूळ!
9
SBI एटीएम व्यवहारांच्या शुल्कात वाढ; सॅलरी अकाउंटसाठी 'अनलिमिटेड' फ्री ट्रान्झॅक्शनची सुविधा बंद
10
पूजा खेडेकरला बांधून ठेवलं, आई-वडिलांना गुंगीचं औषध दिलं, अन…, नोकरानेच केली घरात चोरी
11
IND vs NZ 1st ODI : नव्या वर्षात टीम इंडियासाठी 'शुभ' संकेत! डावखुऱ्या हाताने नाणे उंचावत गिल ठरला 'उजवा' अन्...
12
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना मोठा धक्का! दगडू सकपाळ यांचा शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश
13
श्रेयस अय्यर विमानतळावर असताना विचित्र प्रकार! कुत्र्याने जबडा उघडला, तितक्यात... (VIDEO)
14
चांदीचा धमाका! एका आठवड्यात १५ हजार रुपयांची वाढ; सोने विक्रमी पातळीच्या दिशेने, ताजे दर काय?
15
US Air Strike In Syria : आता सीरियात अमेरिकेचा मोठा हल्ला, 35 ठिकानांवर बॉम्बिंग; 90 हून अधिक 'प्रिसीजन म्यूनिशन'चा वापर
16
Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन कुठे पाहाल? कोणते स्पर्धक असणार? जाणून घ्या एका क्लिकवर
17
“पुतिन यांचा १० वर्षे प्रयत्न पण अपयश, मी ८ युद्धे थांबवली, प्रत्येकासाठी नोबेल हवे”: ट्रम्प
18
"नाकातून रक्त, रक्ताच्या उलट्या अन्..."; व्हेनेझुएलात अमेरिकेनं वापरलं 'मिस्ट्री वेपन'! मादुरो यांच्या सैनिकानंच सांगितला संपूर्ण थरार
19
मुंबई पोलिसांना कडक सॅल्यूट! हरवलेले ३३,५१४ मोबाइल परत केले; युपीतच १६५० सापडले, २ कोटी...
20
Malegaon Municipal Election 2026 : मालेगावी उमेदवारांचा प्रचार मंत्री, आजी-माजी आमदारांच्या खांद्यावर
Daily Top 2Weekly Top 5

मनपा निवडणुकीचा रात्रीस खेळ चाले; ११.३० वाजता अपलोड झाली शपथपत्रे !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 10:39 IST

मतदारांच्या नैतिक अधिकारांचे हनन : राज्य निवडणूक आयोगाच्या ऑफलाईन कारभाराचे फलित

सोलापूर : महापालिका निवडणूक लढवणाऱ्या सर्वपक्षीय ५६४ उमेदवारांची शपथपत्रे सात दिवसानंतर ऑनलाईन जाहीर झालेली नव्हती. यावर सामाजिक कार्यकर्त्यांनी टीका केल्यानंतर शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता ही शपथपत्रे महापालिकेच्या वेबसाईटवर अपलोड झाली. राज्य निवडणूक आयोग आणि महापालिकेने गेल्या सात दिवसात सामान्य मतदारांच्या नैतिक अधिकारांचे हनन केल्याची टीका सामाजिक कार्यकर्त्यांनी केली.

महापालिकेच्या गत निवडणुकीत अर्ज भरण्याची प्रक्रिया ऑनलाइन होती. यंदा ही प्रक्रिया ऑफलाइन झाली. अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला २३ डिसेंबरपासून सुरुवात झाली. राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांचे अर्ज ऑनलाइन अपलोड करुन घेतले नाहीत. त्यामुळे ऑफलाइन प्रक्रिया सुरू राहिली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस २ जानेवारी होता. त्यानंतर ३ जानेवारी रोजी आयोगाकडून निवडणूक रात्री उशीरा ११,३० वा. अपलोड झालेली माहिती सर्व निवडणूक अधिकाऱ्यांकडून गुरुवारी पालिकेला शपथपत्रे मिळाली. गुरुवारी सायंकाळी पालिकेच्या वेबसाइटवर ही शपथपत्रे अपलोड करण्याचे काम सुरू होते.

डॉ. सचिन ओंबासे, निवडणूक निर्णय अधिकारी

अधिकाऱ्यांना उमेदवारांची माहिती आणि त्यांची शपथपत्रे भरण्यासाठी आयडी आणि पासवर्ड देण्यात आले.ही माहिती भरुन झाल्यानंतरच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पालिका प्रशासनाकडे गुरुवारी दुपारी शपथपत्रांची 'पीडीएफ कॉपी' दिली. महापालिकेच्या संगणक विभागाने दुपारनंतर माहिती अपलोड करायला सुरुवात केली होती.

उमेदवारांची शपथपत्रे जाहीर करण्यास विलंब

सोलापूर : महापालिकेच्या निवडणुकीचे चित्र रविवारी स्पष्ट झाले. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची शपथपत्रे चार दिवसानंतर महापालिकेच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आलेली नाहीत. 'थोडं थांबा लवकरच देऊ', असे सांगत प्रशासन वेळ मारून नेत असल्याचे गुरुवारी दिसून आले.

शपथपत्र का महत्त्वाचे

शपथपत्रांमध्ये उमेदवारांची वैयक्तिक माहिती, त्यांचे शिक्षण आणि पदवी याबद्दलची माहिती असते. उमेदवाराची स्थावर आणि जंगम मालमत्तेची यादी, दाखल असलेले गुन्हे याबद्दलची माहिती द्यावी लागते. या माहितीच्या आधारे अनेक मतदार या उमेदवाराला मतदान करायचे की नाही याचा निर्णय घेतात.

निवडणूक कार्यालयाबाहेर पोलिस तैनात आहेत. त्यामुळे निवडणूक कार्यालयाबाहेर लावलेली माहिती आणि शपथपत्रे पाहण्यासाठी सर्वसामान्य माणूस कसा जाणार? सर्व मतदारांनी एकाचवेळी जायचे ठरवले तर पोलिस सोडतील का? त्यामुळे मतदारांना ऑनलाइन माहिती पाहणे सोयीस्कर आहे. आयोगाने उमेदवारांसाठी ऑफलाइन प्रक्रिया राबविताना मतदारांसाठी सर्व प्रकारची माहिती ऑनलाइन कशी मिळेल याची व्यवस्था करणे आवश्यक होते. आता तुम्ही मतदारांच्या नैतिक अधिकारांचे हनन करुन ठेवले आहे. या अनुभवातून जि. प. निवडणुकीत सुधारणा व्हायला हवी, हीच अपेक्षा.अॅड. सरोजनी तमशेट्टी, सामाजिक कार्यकर्त्या 

English
हिंदी सारांश
Web Title : Solapur Municipal Election: Candidates' affidavits uploaded late after public criticism.

Web Summary : Solapur municipal election affidavits were belatedly uploaded online after public outcry. The delay, lasting seven days, drew criticism from activists, who accused authorities of infringing on voters' rights. The online availability of affidavits is crucial for informed voter decisions.
टॅग्स :Solapur Municipal Corporation Electionसोलापूर महानगरपालिका निवडणूक २०२६Electionनिवडणूक 2026